शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

पूर्ण वेळ देणाऱ्याला महिला आयोगाची धुरा द्या; मविआ महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 07:33 IST

‘विद्यमान अध्यक्षांकडे कायद्याची पदवी नाही’

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वैष्णवी हगवणे प्रकरण सीआयडीकडे देण्यात यावे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी २४ तास वेळ देऊ शकणाऱ्या आणि कायदा पदवीधर महिलेची नियुक्ती करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे मंगळवारी केली. 

महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, माजी आमदार आणि प्रवक्त्या विद्या चव्हाण, काँग्रेस आ. ज्योती गायकवाड, उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर यांचा समावेश होता.  

आयोगाकडे आलेल्या तक्रारींचा निपटारा ई-मेलवरच केला जातो. वैष्णवी हगवणे, प्रिया फुके प्रकरणात आयोग निष्क्रिय राहिला. आयोगात ६ सदस्यांची नियुक्ती झालेली नाही. शहरांपुरते आयोगाचे काम मर्यादित आहे. अनेक तक्रारी प्रलंबित असूनही सहा महिन्यांनंतर आयोगाच्या बैठका होतात. आयोगाच्या या कार्यपद्धतीबद्दल आम्ही राज्यपालांकडे तक्रार केली आणि राज्यपालांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती रोहिणी खडसे यांनी पत्रकारांना दिली. 

‘विद्यमान अध्यक्षांकडे कायद्याची पदवी नाही’

आयोगावर पूर्ण वेळ काम करणारी अध्यक्षा देण्यावर मविआच्या नेत्यांचे एकमत झाले आहे. विद्यमान अध्यक्षांनी कायद्याची पदवी घेतलेली नाही. ई-मेल पाठवण्याला त्या सूमोटो म्हणत असतील, तर त्यांना कायदा कसा कळणार? त्यामुळे कायद्याचा परीघ माहिती असणारी महिला या पदावर असावी, असे उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.

पाच महिन्यांत ४,७३६ महिलांचा छळ झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताना महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी महिला आयोगाने सूमोटो  दाखल करून काम करणे अपेक्षित आहे, असे खडसे म्हणाल्या.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीRupali Chakankarरुपाली चाकणकर