शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला तीन हजार कोटींचे पॅकेज द्या; नारायण राणेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 08:02 IST

पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत फडणवीस सरकारने दिल्या होत्या, तशा शिक्षण आणि रोजगारासाठीच्या सवलती देऊन मराठा समाजासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केली.

ठाणे : महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले आहे. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडीने आता तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत फडणवीस सरकारने दिल्या होत्या, तशा शिक्षण आणि रोजगारासाठीच्या सवलती देऊन मराठा समाजासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केली.यावेळी भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश सचिव संदीप लेले, गटनेते मनोहर डुंबरे उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप महायुती सरकारने कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिले. परंतु, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले. सरकारच्या वकिलांमध्ये समन्वय नव्हता. सरकारने खटला चालविण्यास टाळाटाळ करून तारखा मागितल्या. गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या परिशिष्टाचे इंग्रजीत भाषांतर करून दिले नाही. त्यामुळे आयोग एकतर्फी असल्याचा समज झाला, असा आरोप राणे यांनी केला.राणे पुढे म्हणाले की, मराठा आरक्षण टिकविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा उपाय हातात आहे, परंतु सरकारने तसे केलेले नाही. केंद्र सरकारने मात्र १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांचा अधिकार अबाधित आहे, हे स्पष्ट होण्यासाठी फेरविचार याचिका दाखल केली आहे. घटना दुरुस्तीनंतरही मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल, असेही राणे यावेळी म्हणाले . फडणवीस -पवार भेट अराजकीयदेंवद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात झालेली भेट अराजकीय आहे. यापूर्वी मीदेखील पवार यांना भेटलो असल्याचेही नारायण राणे यांनी सांगितले. या भेटीमुळे कोणाची प्रकृती बिघडणार असेल, तर त्यांनी औषध घ्यावं, इंजेक्शनदेखील उपलब्ध आहे, अशी टीकाही त्यांनी केली. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी सोडून इतर सर्व पक्ष आम्ही जाऊ असे म्हणतात. राष्ट्रवादी मात्र कोणीही येऊ दे आम्ही सरकारमध्ये असणार, असे म्हणत असल्याची खिल्ली त्यांनी उडविली. सरकार स्थिर नाही, ते केव्हाही पडेल, असा पुनरुच्चार राणे यांनी केला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Maratha Reservationमराठा आरक्षण