शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दुधाला ३५ रुपये प्रतिलिटर खरेदी दर द्या, दूध संघांना राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 06:10 IST

पुणे : राज्यातील खासगी व सहकारी दूध संघ शेतकऱ्यांकडून प्रतिलिटर ३० रुपये इतक्या कमी दराने दूध खरेदी करतात. दूध ...

पुणे : राज्यातील खासगी व सहकारी दूध संघ शेतकऱ्यांकडून प्रतिलिटर ३० रुपये इतक्या कमी दराने दूध खरेदी करतात. दूध संघांनी हा खरेदी दर किमान ३५ रुपये प्रतिलिटर इतका करावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. तसेच, दूध संघांच्या व्यवस्थापनाच्या खर्चाचा ही अभ्यास करून नफ्याचा हिस्सा उत्पादकांना मिळावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करील, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी दिली.

विखे यांनी राज्यातील सर्व दुग्ध सहकारी संस्थांची बैठक पुण्यात घेतली. त्यानंतर बैठकीतील निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली.  राज्यातील गाईच्या दुधाचे दर मध्यंतरी कमी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांनी दर वाढवण्याची मागणी केली होती. दूध खरेदी दर हा राज्यात एकसारखा असावा आणि तो ३५ रुपये लिटर देण्यात यावा, अशी या बैठकीत चर्चा झाली.

पशुखाद्य दरात २५ टक्के दर कमी करण्याचे निर्देश पशुखाद्य दरामध्ये २५ टक्के दर कमी करण्याचे संबंधित कंपन्यांना आम्ही निर्देश दिले आहेत, त्यामुळे पशुखाद्य कमी दरात मिळून उत्पादन खर्च कमी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.  एक ते तीन रुपयांमध्ये पशुधनाचा विमा उतरण्याचा सरकारचा विचार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग असेल, असा विश्वास विखे-पाटील यांनी व्यक्त केला.  लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांना लसीचा दुसरा डोसही मोफत देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पशुवैद्यकीय डिप्लोमा आता बारावीनंतरराज्यात यापुढे बारावीनंतर तीन वर्षांचा पशुवैद्यकीय डिप्लोमा सुरू करण्यात येईल. नागपूरच्या पशुवैद्यकीय विद्यापीठामार्फत त्याची अंमलबजावणी होईल, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.दुधात भेसळ करणाऱ्यांवर मोक्कादुधातील भेसळ रोखण्यासाठी भेसळ करणारे आणि तसे दूध स्वीकारणाऱ्या संस्थांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव आहे, अशी यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्याद्वारे भेसळखोरांवर छापा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील