शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

‘पारदर्शक’ कारभाराबद्दल बांधकाममंत्र्यांचा जाहीर सत्कार करा, विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 05:48 IST

बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे असून या ‘पारदर्शक’ कारभाराबद्दल बांधकाममंत्र्यांचा जाहीर सत्कार करावा, असा सणसणीत टोला विरोधकांनी लगावला आहे.

मुंबई : राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्यासाठी डांबराचा खर्च अर्धाच दाखवा, चांगल्या बातम्यांसाठी पत्रकारांना मॅनेज करा, हे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे असून या ‘पारदर्शक’ कारभाराबद्दल बांधकाममंत्र्यांचा जाहीर सत्कार करावा, असा सणसणीत टोला विरोधकांनी लगावला आहे.‘डांबराचा खर्च अर्धाच दाखवा, बांधकाममंत्र्यांचा अजब सल्ला’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकांम मंत्र्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला.चंद्रकांतदादा म्हणतात तसे सार्वजनिक बांधकाम खाते वर्र्षाला ४ हजार कोटी रुपये खर्च करीत असेल तर मागील तीन वर्षात खर्चझालेले १२ हजार कोटी रुपये कुठे गेले? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, राज्यात पारदर्शक भ्रष्टाचार सुरु आहे. अधिकाºयांना भ्रष्टाचार कसा करायचा याचे सल्ले महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्या मंत्र्याने दिले नव्हते. पाटील यांनी ती कमतरता भरून काढली आहे. त्यामुळे त्यांचा शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींच्या हस्ते सत्कार केला पाहिजे. राज्याचा कॅबिनेट मंत्री अशा प्रकारे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम करत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.यासोबतच पत्रकारांना मॅनेज करून चांगल्या बातम्या छापून आणा असे सांगण्याने माध्यमांच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उभे होते, असेही सावंत म्हणाले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा