शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

मिळकतीचे जीआयएस मॅपिंग कासवगतीने

By admin | Updated: May 29, 2017 03:29 IST

महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये यंदा कोणत्याही स्वरूपाची करवाढ न करता मिळकतकरातून गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २५० ते ३०० कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये यंदा कोणत्याही स्वरूपाची करवाढ न करता मिळकतकरातून गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २५० ते ३०० कोटी रुपयांच्या करवाढीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. प्रशासनाला सध्या सुरू असलेल्या जीआयएस मॅपिंगमुळे शहरातील हजारो मिळकती कराच्या कक्षेत येऊन हे वाढीव उद्दिष्ट सहज पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून शहरामध्ये अत्यंत कासवगतीने जीआयएस मॅपिंगचे काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे शहरामध्ये सुमारे ८ लाख २० हजार मिळकतींची अधिकृत नोंद आहे. परंतु, यापैकी तब्बल अडीच ते तीन लाख मिळकती करच भरत नसल्याचे समोर आले. यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व मिळकतींचे जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला. यामुळे करआकारणी न झालेल्या मिळकती, मिळकत वापरातील बदल, वाढीव बांधकाम या सर्वांची माहिती मिळणार आहे. यासाठी प्रशासनाने सार आय.टी. रिसोर्स कंपनी, मुंबई आणि सायबर सिस्टिम अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर कंपनी ठाणे या दोन खासगी एजन्सींना तब्बल तीस कोटी रुपये देऊन हे जीआयएस मॅपिंगचे काम सुरू आहे. या कंपन्यांनी २० सप्टेंबर २०१६ ते मे २०१७ अखेर पर्यंत केवळ १ लाख ९० हजार मिळकतीचे जीआयएस मॅपिंगचे काम पूर्ण केले. यामध्ये मिळकतकर आकारणी न झालेल्या खूपच कमी मिळकती समोर आल्या आहेत. शहरातील संपूर्ण मिळकतीचे जीआयएस मॅपिंग झाल्यानंतर एकूण उत्पन्नामध्ये तब्बल एक हजार कोटी रुपयांची भर पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता.घरोघरी पाहणी : दोन हजारावर कर्मचारीमॅपिंगसाठी खासगी एजन्सीच्या लोकांसोबत महापालिकेनेदेखील तब्बल दोन हजारपेक्षा अधिक कर्मचारी नियुक्त केले आहेत. महापालिकेचे हे कर्मचारी घरोघरी जाऊन पाहणी करत आहेत. परंतु सध्या एजन्सी आणि महापालिका कर्मचारी यांच्यामध्ये कोणताही समन्वय नाही. त्यामुळे गेल्या नऊ महिन्यांत केवळ १ लाख ९० हजार मिळकतीचे मॅपिंग करणारी एजन्सी आठ लाख मिळकतीचे जीआयएस मॅपिंग कधी पूर्ण करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.सहा महिन्यांत जीआयएसचे काम पूर्ण करणारमहापालिकेकडे नोंद असलेल्या मिळकतींपेक्षा अधिक मिळकती शहरामध्ये असल्याचा अंदाज आहे. ज्या मिळकती महापालिकेच्या नजरेतून सुटल्या आहेत, अशा सर्व मिळकती कराच्या कक्षेत आणण्यासाठी शहरामध्ये सर्व मिळकतीचे जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत १ लाख ९० हजार मिळकतींचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात येत असून, पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल.- सुहास मापारी, उपायुक्त, करआकारणी व करसंकलनशहरातील मिळकतींची माहितीनिवासी मिळकती : ६ लाख ६० हजारव्यावसायिक मिळकती : १ लाख २० हजारइतर, मित्र मिळकती : ४० हजार एकूण मिळकती : ८ लाख २० हजार जीआयएस मॅपिंग पूर्ण : १ लाख ९० हजार