पुणे : हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा केबलने गळा आवळून खून करण्यात आल्याचा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला आहे़रसिला राजू ओपी (२५, मूळ केरळ) असे मृत तरुणीचे नाव आहे़ ती सुटी असूनही रविवारी काही कामानिमित्त कंपनीत आली होती. रसिला हिचा इन्फोसिस या कंपनीतच गळा आवळून खून झाल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना रात्री ९ च्या सुमारास समजली़ त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ खून कोणी केला याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
पुण्याच्या ‘इन्फोसिस’मध्ये तरुणीचा खून
By admin | Updated: January 30, 2017 04:26 IST