शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेत; 'त्या' आरोपांवर पीयूष गोयल यांचा पलटवार
2
'खटाखट'मुळे काँग्रेस कार्यालयाबाहेर 'फटाफट' रांगा; गॅरंटी कार्ड घेऊन महिला पोहचल्या 
3
अजित पवारांच्या बैठकीला ५ आमदारांची दांडी; पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार?
4
बारामतीतून निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार नावाच्या उमेदवाराला किती मतं पडली?
5
३ बाद २६ धावा, पाकिस्तानची निघाली हवा! बाबर आजमच्या नावावर इतिहासातील 'टुकार' कामगिरी
6
१० रुपयांची भीक, ५६०ची दारू अन् चिमुकल्याचे अपहरण; 'फोन -पे' मुळे छडा, आरोपी जेरबंद
7
PAK vs USA Live : मुंबईच्या सौरभने पाकिस्तानची जीरवली, टेलरच्या अफलातून कॅचने रिझवानची विकेट मिळवली, Video 
8
मोदी 3.0 फार काळ टिकणार नाही; निर्मला सीतारामन यांच्या पतीचं रोखठोक मत
9
३६ जागांवर गेम झाला अन् भाजपाच्या जागांचं गणित बिघडलं; जाणून घ्या, डाव कुठे मोडला?
10
शेअर मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? राहुल गांधींनी केला सर्वात मोठ्या घोटाळ्याचा आरोप...
11
मारहाणीच्या घटनेवर कंगनानं मौन सोडलं, चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं? सर्व VIDEOमध्ये सांगितलं
12
कंगना रणौतला कानाखाली का मारली? CISF महिला जवानाने सांगितलं कारण; व्हिडीओ व्हायरल
13
मजेशीर Video! Dale Steyn ला अमेरिकेत T20WC साठी नेमलेला कर्मचारी शिकवतोय गोलंदाजी
14
विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदादांविरोधात युगेंद्र पवार मैदानात? आव्हाडांचे सूचक भाष्य
15
शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा, लोकांचे ३० लाख कोटी बुडाले; राहुल गांधींचा मोदी-शाह यांच्यावर गंभीर आरोप
16
याला म्हणतात परतावा! 1 वर्षात पैसा डबल, आजही 15% नं वाढला भाव; आता कंपनी स्प्लिट करणार शेअर?
17
TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला?
18
नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही; भाजपने स्पष्टच सांगितले...
19
उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
20
कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली

मुंबईत मुलींचे वर्चस्व

By admin | Published: June 14, 2017 12:40 AM

दहावीच्या निकालात मुंबई विभागात मुलींचे वर्चस्व दिसून आले आहे. निकालाचा टक्का घसरला असला तरी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या कायम आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहावीच्या निकालात मुंबई विभागात मुलींचे वर्चस्व दिसून आले आहे. निकालाचा टक्का घसरला असला तरी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या कायम आहे. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० हजार अधिक विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते, अशी माहिती मुंबई विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली. मार्च ते एप्रिलदरम्यान दहावीची परीक्षा राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आली होती. मुंबई विभागातून दहावीच्या परीक्षेला ३ लाख ४३ हजार ९९१ नियमित विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३ लाख ४२ हजार ९७३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून, ३ लाख ८ हजार ९९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच मुंबई विभागाचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल हा ९०.०९ टक्के लागला आहे. मुंबई विभागातून पुनर्परीक्षार्थी (रिपिटर) विद्यार्थ्यांची संख्या ४१ हजार ९८३ इतकी होती. त्यापैकी १८ हजार १६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे पुन्हा परीक्षेला बसून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ४३.२६ टक्के इतकी आहे. मुंबई विभागात प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत ७२ हजार ७१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर १ लाख ४ हजार ९९९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, द्वितीय श्रेणीत ९८ हजार ६१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तृतीय श्रेणीत ३२ हजार ६७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याप्रमाणे एकूण ३ लाख ८ हजार ९९६ नियमित विद्यार्थी मुंबई विभागातून उत्तीर्ण झाले आहेत. अरेबिक, फ्रेंच, आॅटोमोबाइल सर्व्हिस टेकनिक, ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेस, फिजिकल एज्युकेशन या विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मुंबई विभागातून एकूण ३ हजार ६४४ शाळांमधून १ लाख ८१ हजार २ मुले आणि १ लाख ६१ हजार ९१७ मुली दहावीच्या परीक्षेस बसल्या होत्या. त्यातील १ लाख ६० हजार १३८ मुले तर १ लाख ४८ हजार ८५८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८८.४७ टक्के तर मुलींचे प्रमाण ९१.९० टक्के इतके आहे. २८ हजार ९७१ मुले आणि १३ हजार १२ मुली या पुनर्परीक्षार्थी होत्या. त्यातील ११ हजार ८७२ मुले आणि ६ हजार २८८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यात मुले पास होण्याची टक्केवारी ४०.९८ टक्के आणि मुली पास होण्याची टक्केवारी ४८.३२ टक्के इतकी आहे. ८ शाळांचा शून्य टक्के निकाल मुंबई विभागातील ८ शाळांचा निकाल हा शून्य टक्के लागला आहे. तर, १ ते १० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या ४ आहे. ३ हजार ६३६ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे.