शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 19:26 IST

Girish Mahajan News: एकनाथ खडसे म्हणतात की, मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपाचा आहे. एक भूमिका घ्यायला हवी, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

Girish Mahajan News: भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेलेल्या एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपामध्ये येणार असल्याचे जाहीर करून अनेक दिवस लोटले असले तरी अद्यापही भाजपा प्रवेशाबाबतच्या हालचाली पाहायला मिळत नाहीत. भाजपामधीलच काही नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षात परतण्यास विरोध करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंबाबत मोठे विधान केले आहे. 

मीडियाशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत. खडसे यांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यानंतर त्यांनी भाजपाचे काम करावे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. कधी म्हणतात की, मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपाचा आहे. विधानसभेला मुलगी तुतारी घेऊन उभे राहण्याच्या तयारीत आहे. एकनाथ खडसे यांची भूमिका संधीसाधूपणाची आहे. घरात सगळेच पक्ष ठेवायचे, असे त्यांचे सुरु आहे. आमदारकी आणि खासदारकीसाठी सगळ्यांचे काम करायचे. लोकांना असे राजकारण आवडत नाही, त्यामुळे एक भूमिका घेतली पाहिजे, असे गिरीश महाजन यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले.

उद्धव ठाकरेंनी केलेली चूक अक्षम्य, त्याचा फटका बसणारच 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे ऋणानूबंध होते. आम्ही सन्मानाने मातोश्रीवर जायचो. आता मात्र उद्धव ठाकरेंना दररोज तीन ठिकाणी फिरावे लागते. कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेसच्या ऑफिसला जावे लागते. प्रकाश आंबेडकरांनी बोलावले तर त्यांच्याही ऑफिसला जावे लागेल. उद्धव ठाकरे यांनी इतकी वाईट स्थिती स्वतःवर  ओढावून घेतली आहे. नरेंद्र मोदी राजकीय नाही तर वैयक्तिक कामात ठाकरे कुटुंबाला मदत करतील. मात्र उद्धव ठाकरेंनी केलेली चूक अक्षम्य आहे. त्याचा फटका बसणारच आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, संजय राऊतांनी केलेल्या टीकेला गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. आमच्या खिडक्या, दरवाजे तुमच्यासाठी उघडे नाहीत. तुम्हाला लोकांनीच बाहेर हाकलले आहे. आमच्याबरोबर निवडून आलात आणि गद्दारी केली. मोदींच्या सभेमुळे तुमच्या जागा निवडून आल्या. निवडून आल्यावर इतक्या वर्षांच्या संबंधांना तिलांजली दिली. आता काँग्रेससाठी मते मागत आहात. तुमची विश्वासार्हता आणि हिंदुत्व संपले, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.  

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनeknath khadseएकनाथ खडसे