शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

‘मासिक पाळी’ विषयावर गज्वी यांचे नवे नाटक ‘कळीबंद पाऊस’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 12:37 IST

महिलांच्या मासिकचक्रावर नाटक लिहिण्याचा विचार एकाही नाटककारांच्या मनाला ‘शिवला’ नाही...  

ठळक मुद्देलवकरच हे नाटक पुस्तकरूपात वाचकांच्या भेटीला येणार ‘मासिक पाळी’ या विषयावर अनेक लघुपटांसह हिंदीत  ‘पॅडमॅन’सारखा चित्रपटसध्या या नाटकाच्या अभिवाचनातून हा विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने पाऊल

नम्रता फडणीस- पुणे :  ‘किरवंत,’ ‘छावणी,’ ‘देवनवरी,’ शुद्ध बीजापोटी’ यांसारख्या नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ. प्रेमानंद गज्वी यांच्या दर्जेदार कलाकृतींच्या मालिकेमध्ये आता आणखी एका  ‘हटके’ नाटकाची भर पडणार आहे. ते म्हणजे  ‘कळीबंद पाऊस.’ खरे तर या शीर्षकातच नाटकाचे संपूर्ण सार दडलेले आहे. ‘मासिक पाळी’ या विषयावर अनेक लघुपटांसह हिंदीत  ‘पॅडमॅन’सारखा चित्रपटही आला. मात्र महिलांच्या मासिकचक्रावर नाटक लिहिण्याचा विचार एकाही नाटककारांच्या मनाला ‘शिवला’ नाही.  परंतु सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत समाजातील विदारक सत्य मांडण्याची हातोटी असलेल्या डॉ. गज्वी यांनी महिलांशी निगडित अशा अत्यंत संवेदनशील विषयावर लेखन करण्याचे धाडस केले आहे. लवकरच हे नाटक पुस्तकरूपात वाचकांच्या भेटीला येणार आहे. ‘मासिक पाळी’ या विषयावर अजूनही विशेषत: ग्रामीण भागातील महिलांमध्ये खुलेपणाने चर्चा होत नाहीत. अशा परिस्थितीत नाटकाच्या माध्यमातून मुलींचे वयात येणे, त्यांच्यात होणारे शारीरिक बदल या नैसर्गिक क्रियेकडे पाहण्याचा कुटुंबांचा दृष्टिकोन यावर डॉ. गज्वी यांनी लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकाविषयी डॉ. गज्वी यांच्याशी  ‘लोकमत’ने संवाद साधला. ते म्हणाले, की मी नेहमीच वेगळ्या विषयांच्या शोधात असतो. एखादा विषय डोक्यात आला, की माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात आणि मी त्याची उत्तरे गवसण्याच्या मागावर लागतो. ग्रामीण भागात मुलीला पाळी आली, की ‘कावळा शिवला का?’ असा शब्दप्रयोग प्रयोग करून तिला लांब बसवले जाते. शहरी भागात हे चित्र फारसे दिसत नाही. पण मुलीला जेव्हा पहिल्यांदा पाळी येते तेव्हा तिची ओटी भरली जाते. तिच्यासाठी सगळेच नवीन असते. तिच्यात अनेक शारीरिक बदल घडत असतात. तिच्या वयात येण्यामुळे आई-वडिलांना येणारे दडपण, त्यांच्या मनात सुरू झालेले विचारचक्र असा सगळ्यांचा परामर्श नाटकात घेण्यात आला आहे. या विषयावर कुटुंब आणि समाजाचे प्रबोधन व्हावे, हा लेखनामागचा हेतू आहे. रंगभूमीवर असा प्रयोग अद्यापही कुणी केलेला नाही. पहिल्यांदाच असा विषय नाटकाच्या माध्यमातून मांडला जात आहे. या नाटकाची मूळ संहिता तयार झाली आहे. ..........सध्या या नाटकाच्या अभिवाचनातून हा विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. लवकरच नाटक पुस्तकरूपात आणण्याचा मानस आहे. माझी नाटके नेहमीच वेगळ्या धाटणीची राहिली आहेत. हा विषय प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरदेखील आणता येणे शक्य आहे, असे गज्वी म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिला