शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Video - कागलला धनंजय महाडिक यांच्या भाषणावेळी गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 14:05 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज, सोमवारपासून सुरु झालेल्या राज्यव्यापी परिवर्तन यात्रेच्या कागल येथे सुरु असलेल्या पहिल्याच सभेत गोंधळाचे गालबोट लागले. या सभेत पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी भाषणात पक्षाचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेतल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घालत आक्षेप घेतला, त्यामुळे खासदार महाडिक यांना भाषण थांबवणे भाग पडले. हा सगळा प्रकार पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीतच घडला. यावरुन पक्षातील दुफळी उघड झाली आहे.

ठळक मुद्देकागलला धनंजय महाडिक यांच्या भाषणावेळी गोंधळराष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला गटबाजीचे गालबोट, महाडिक विसरले मुश्रीफ यांचे नाव

कागल/कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज, सोमवारपासून सुरु झालेल्या राज्यव्यापी परिवर्तन यात्रेच्या कागल येथे सुरु असलेल्या पहिल्याच सभेत गोंधळाचे गालबोट लागले. या सभेत पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी भाषणात पक्षाचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेतल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घालत आक्षेप घेतला, त्यामुळे खासदार महाडिक यांना भाषण थांबवणे भाग पडले. हा सगळा प्रकार पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीतच घडला. यावरुन पक्षातील दुफळी उघड झाली आहे.महाडिक यांनी भाषणात मुश्रीफ यांचे नाव न घेतल्याने या सभेत सुरुवातीला चुळबूळ सुरु झाली. नंतर त्याचे रुपांतर घोषणाबाजीत झाले. मुश्रीफ यांनी व्यासपीठावरुन कार्यकर्त्यांना दम दिला, तरीही कार्यकर्ते आक्रमकपणे घोषणा देतच होते. त्यामुळे महाडिक भाषण थांबवून खाली बसले. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवारही उठून उभे राहिले. आमदार मुश्रीफ यांनी खासदार महाडिक यांना पुन्हा माईकजवळ आणले, आणि त्यांना भाषण पुन्हा सुरु करण्यास सांगितले. महाडिक यांनी यावेळी जाहीर दिलगिरी व्यक्त केली.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरुन मुश्रीफ आणि महाडिक यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरु आहे. महाडिक यांच्या उमेदवारीला मुश्रीफ यांनी थेट शरद पवार यांच्या उपस्थितीतच विरोध केला आहे. त्यावरुन राष्ट्रवादीतील हा वाद नव्याने पेटण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफ