शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

जुन्या अनुभवावरून सांगतो, मोदींना समर्थन करत असाल तर...; आदित्य ठाकरेंचं TDP आणि JDU ला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 14:43 IST

आदित्य ठाकरे यांनी टीडीपीला आणि जेडीयूला आवाहन करत लोकसभेचं अध्यक्षपद तुमच्याकडे मिळवावं, असं आवाहन केलं आहे.

Aditya Thackeray ( Marathi News ) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशात चुरशीचं चित्र पाहायला मिळालं. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या ६० हून अधिक जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपला आपल्या मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. अशा स्थितीत १८ जागा मिळावलेल्या टीडीपी आणि १२ जागा मिळवलेल्या जेडीयू या एनडीएतील दोन घटकपक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या इंडिया आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी टीडीपीला आणि जेडीयूला आवाहन करत लोकसभेचं अध्यक्षपद तुमच्याकडे मिळवावं, असं आवाहन केलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "भाजपला समर्थन देऊ इच्छिणाऱ्या संभाव्य मित्रपक्षांना माझी एक नम्र विनंती आहे. लोकसभा अध्यक्षपद तुमच्याकडे घ्या. कारण भाजपच्या डावपेचांचा आम्हाला अनुभव आहे. ज्या क्षणी ते तुमच्या मदतीने सरकार स्थापन करतील, तेव्हाच ते तुम्हाला दिलेला शब्द मोडतील आणि तुमचा पक्षही फोडण्याचा प्रयत्न करतील," असं म्हणत आदित्य यांनी एनडीएतील पक्षांना सावध केलं आहे.

जेडीयू-टीडीपी कोणती खाती मागणार?

केंद्रात सत्तास्थापनेच्या तयारीत असलेल्या एनडीएतील घटक पक्षांना दिली जाणारे मंत्रिपदे व त्यांच्या पसंतीचे मंत्रालयाबाबत गुरुवारी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यात याबाबत प्रदीर्घ बैठक झाली. बैठकीला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष आणि विनोद तावडे यांनाही बोलावण्यात आले होते.  तेलुगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदासह आयटी, दूरसंचार, ग्रामविकास आणि जलशक्ती आदी मलईदार मंत्रालयांची मागणी केली आहे. याशिवाय आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचीही त्यांची मागणी आहे. चंद्राबाबूंना लोकसभा अध्यक्षपदासह किमान तीन मंत्रिपदे हवी आहेत. जदयुचे नेते नितीश कुमार यांनी रेल्वे, कृषी आणि अर्थराज्यमंत्री अशी तीन मंत्रिपदे मागितली आहेत. शिंदेसेनेनेही एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदाची मागणी केली आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेJanta Dal Unitedजनता दल युनायटेडShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल