शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेताच्या नुकसानीची अशी मिळवा भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 10:52 IST

Agriculture: महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल आणि नुकसान भरपाई मिळवायची असेल, तर नुकसानीच्या ७२ तास म्हणजे तीन दिवसांच्या आत तक्रार करणे आवश्यक असते.

मुंबई : महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल आणि नुकसान भरपाई मिळवायची असेल, तर नुकसानीच्या ७२ तास म्हणजे तीन दिवसांच्या आत तक्रार करणे आवश्यक असते. अन्यथा भरपाईमधून वगळण्यात येते.

ऑनलाइन तक्रार अशी नोंदवा- प्ले स्टोअरवरून क्रॉप इन्शुरन्स (Crop Insurance) नावाचे ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून चार पर्यायांपैकी तीन नंबरचा पर्याय ‘नोंदणी खात्याशिवाय खाते सुरू ठेवा’ हा पर्याय निवडावा. - त्यानंतर पाच प्रकारचे पर्याय आपल्यासमोर येतील. त्यातील ‘पीक नुकसान’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि पीक नुकसान सद्यस्थिती असे दोन पर्याय येतील. त्यातील ‘पीक नुकसानीची पूर्वसूचना’ हा पर्याय निवडावा.- त्यानंतर मोबाइल क्रमांक भरून त्यावरील ओटीपी टाकून सबमिट करा. त्यानंतर हंगाम, वर्ष, योजना, राज्य अशी माहिती भरा.- ‘नोंदणीचा स्रोत’ या रकान्यामध्ये विम्याचा फॉर्म कुठून भरला त्याची माहिती भरणे आवश्यक आहे. विमा पॉलिसी क्रमांक भरा. विम्याची संपूर्ण माहिती दिसेल. त्यानंतर कोणत्या पिकाचे नुकसान झाले आहे ते निवडा.- आता फोनवरील लोकेशनचे ॲक्सेस ॲपला देऊन,  तपशीलामध्ये घटनेचा प्रकार, दिनांक, वेळेसह पीक वाढीचा टप्पा, नुकसानीची संभाव्य टक्केवारी, फोटो, व्हिडीओ अशी माहिती  भरून ‘सादर करा’ या बटणावर क्लिक करा. त्यानंतर जो डॉकेट आयडी नंबर येईल तो जपून ठेवा. त्याचबरोबर - नुकसानीची माहिती आपल्या गावातील तलाठ्यालासुद्धा देणे आवश्यक आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र