शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
5
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
6
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
7
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
8
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
9
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
10
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
11
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
12
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
13
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
14
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
15
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
16
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
17
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
18
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
19
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

"काेराेनाचा शेवट करायला सज्ज व्हा"; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लसीकरणाला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 02:30 IST

कोरोनावरील लसीकरण मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड लसीकरण केंद्रापासून केला.

मुंबई : आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे. त्यासाठी सज्ज व्हा, कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले.  युद्धकालीन परिस्थितीत आपण १५ दिवसांत बीकेसीतील केंद्र उभारले. आज हे केंद्र ओस पडले आहे, ते असेच राहो, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली.कोरोनावरील लसीकरण मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड लसीकरण केंद्रापासून केला. या कार्यक्रमाला पर्यटन व मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार झीशान सिद्दिकी, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित आदी उपस्थित होते.ते दिवस आठवले तरी अंगावर काटा येताे. रुग्णालये एप्रिल ते जुलैपर्यंत पावसाने नव्हे तर कोरोना रुग्णांनी वाहत होती. पालिका आयुक्त, डॉक्टर, परिचारिका यांनी त्याही परिस्थितीत लाखो लोकांचे प्राण वाचवले. या कोरोना योद्ध्यांना माझा मानाचा मुजरा, असे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राच्या आरोग्य विभागाने चाचणी करूनच लसीचे वितरण केले. त्यामुळे लसीबाबत संशय घेण्याचे कारण नाही, असेहीत्यांनी स्पष्ट केले.

लस वाटपावरून राजकारण नको -महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत पश्चिम बंगालला कोरोना लसीचा अधिक साठा देण्यात आला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री या नात्याने राज्याचे सर्व नागरिक मला सारखेच आहेत. तसेच, देशातील सर्व नागरिक हे पंतप्रधानांना सारखेच आहेत अथवा असावेत. त्यामुळे कोरोना लस कोणाला कमी, कोणाला जास्त दिली, याबाबत राजकारण नको, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.लस मोफत देणे केंद्राच्या निर्णयावर अवलंबून -केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रथम कोरोनायोद्ध्यांना मोफत लस देण्यात येत आहे. अन्यथा मी देखील लस घेतली असती. केंद्र सरकार मोफत लसीबाबत काय निर्णय घेणार, हे समोर आले की, राज्य सरकार आपला निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

लवकरच लसींचा साठा वाढेलआणखी दोन - तीन कंपन्या लसीची चाचणी करत आहेत. त्यामुळे लवकरच लसींचा साठा वाढेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.आम्ही लस घेतली, तुम्हीही निर्धास्तपणे घ्याकोरोनाची पहिली लस मला मिळाली, याचा खूप आनंद होत आहे. मला लस घेताना कोणतीही भीती वाटली नाही. लस घेतल्यानंतरही कोणता त्रास जाणवला नाही. माझी प्रकृती उत्तम आहे. लस घेतल्यानंतरही योग्य आहार घ्या आणि सुरक्षित रहा. - डॉ. मधुरा पाटील (वांद्रे-कुर्ला संकुलातील केंद्रात पाच महिन्यांपासून आहारतज्ज्ञ)

या ऐतिहासिक क्षणी पहिल्याच यादीत माझे नाव आल्यामुळे मला खूप आनंद होत आहे. सकाळी साडेसहा वाजता मला पालिकेचा एसएमएस आला. त्यानुसार मी लगेच वांद्रे-कुर्ला संकुलात आलो. गेले दहा महिने आपण कोरोनाचा सामना करीत आहोत. मग आता लस घेण्याबाबत भीती कशाला बाळगता? लस घेण्यासाठी बिनधास्त या. - डॉ. सचिन जैन (हिंदुजा रुग्णालय, खार)

लस घेतल्यानंतरही मला कोणताही त्रास जाणवला नाही. मी अगदी ठणठणीत असून आता कामावरही रुजू होत आहे.- डॉ. जवाहर पंजवाणी (खासगी दवाखाना)

सर्वांनी ही लस घ्यावी. त्यानंतरच लसीबाबतची शंका दूर होईल. संपूर्ण देश कोरोनमुक्त होऊ शकेल.    - डॉ. हरीश शेट्टी (हिरानंदानी रुग्णालय)

 

 

 

 

 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाCorona vaccineकोरोनाची लस