शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

रेल्वेस्थानकात ७१ रुपयांत मिळवा तासभर एसी रुम; जाणून घ्या कशी कराल बुक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 08:00 IST

डॉरमेट्री रुमचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने त्या सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

मनोज मालपाणी 

नाशिकरोड रेल्वे - स्थानकावर आजच्या घडीला प्रवाशांसाठी तीन वातानुकूलित रुम आहेत. तीनही रुम खासगी ठेकेदाराला चालवण्यास देण्यात आल्या आहेत.

डॉरमेट्री रुमचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने त्या सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. एका रुममध्ये दोन प्रवासी राहू शकतात. त्यासाठी प्रवाशांकडून तासानुसार भाडे आकारणी केली जाते. २४ तासांकरिता रुम भाड्याने घेतल्यास १ हजार ७०४ रुपये भाडे आकारणी केली जाते. बाहेरील खासगी हॉटेल, लॉज यांच्या दरापेक्षा रेल्वेचे दर जास्त असल्याने त्यास हवा तितका प्रतिसाद मिळत नाही.तीनही रूम बुक करू शकतात. प्रवासी ऑनलाइन अथवा प्रत्यक्ष गेल्यास एका कन्फर्म तिकिटावर तीन रुम बुक करू शकतो. एका खोलीत दोघेजण राहू शकतात.

रुम कशी बुक करालनाशिकरोड रेल्वे स्थानकावरील रुम बुक करायची असल्यास BOOK आयआरसीटीसी रेट्रिग रुम ऑनलाइन साईटवर जाऊन बुक करता येते.त्याकरिता प्रवाशाकडे कन्फर्म तिकीट असायला हवे.तसेच प्रवासी प्रत्यक्षात गेल्यास देखील रुम मिळू शकते.मात्र,प्रत्यक्षापेक्षा ऑनलाईनला अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.

वातानुकूलित रुम दर आकारणीनाशिकरोड रेल्वे स्थानकावरील वातानुकूलित रुममध्ये तीन तासांसाठी ५८४ रुपये, सहा तासांसाठी ८०८ रुपये, नऊ तासांसाठी १ हजार ३२ रुपये, बारा तासांसाठी १ हजार ३६८, एका दिवसासाठी १ हजार ७०४ रुपये तर ४८ तासांकरिता ३ हजार ४०७ रुपये आकारले जातात. खाजगी हॉटेलपेक्षा हे दर अधिक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

वेटिंग रुममध्ये तासाला दहा रुपये

  • नाशिकरोड स्थानकावर दोन नॉन एसी व दोन वातानुकूलित वेटिंग रूम आहेत.
  • महिलांसाठी नॉन एसी व वातानु- कूलित एसी वेटिंग रूम मोफत आहे. पुरुषांसाठी नॉन एसी वेटिंग रूम मोफत आहे.
  • पुरुषांसाठी असलेला वातानुकूलित एसी वेटिंग रूम ठेकेदाराला चालविण्यास दिला असून तेथे प्रवाशांकडून दर तासाला दहा रुपये भाडे आकारले जातात.

 

स्थानकावर प्रवाशांसाठी तीन वातानुकूलित रुम उपलब्ध आहेत. कन्फर्म तिकीट असल्यास ऑनलाइन व प्रत्यक्ष रूम बुकिंग केली जाऊ शकते. तसेच कॉमन डॉरमेट्री रूमचे नूतनीकरणाचे काम सुरु असून त्या ठिकाणी एकूण सहा बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.- आर. के. कुठार, नाशिकरोड रेल्वे स्थानक प्रबंधक 

टॅग्स :railwayरेल्वे