मुंबई : भांडूप मधील संजय पगारे या दलित तरुणाच्या हत्याकांडातील आरोपी असलेल्या भूपेंद्र आरेकर उर्फ खंड्या याच्यावर पगारे कुटुंबीयांनी बुधवारी रागाच्या भरात प्राणघातक हल्ला चढविला होता. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी अजय आणि स्वप्निल, या दोन तरुणांना अटक केली. भांडूप टेंभीपाडा येथील रहिवाशी असलेल्या संंजय पगारे या तरुणाच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड संभाजी काशीद व खंड्यासह त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
आरोपीवर हल्ला करणारे गजाआड
By admin | Updated: May 10, 2015 04:17 IST