शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

आईचा विरोध झुगारला; यवतमाळात पार पडला समलिंगी विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 10:54 IST

आपल्या गावात असे घडूच शकत नाही, या भ्रमात असलेल्या यवतमाळकरांना सध्या एका विवाहाने अचंब्यात टाकले आहे. चक्क दोन तरुणांनी एकत्र येत एकमेकांशी विवाह केला. तोही यवतमाळच्या एका नामांकित हॉटेलमध्ये.

यवतमाळ : सुखवस्तू देशांमध्ये आणि विलासी कुटुंबांमध्येच समलिंगी विवाहाची टूम असावी, असा यवतमाळच्या सामान्य माणसाचा समज होता. आपल्या गावात असे घडूच शकत नाही, या भ्रमात असलेल्या यवतमाळकरांना सध्या एका विवाहाने अचंब्यात टाकले आहे. चक्क दोन तरुणांनी एकत्र येत एकमेकांशी विवाह केला. तोही यवतमाळच्या एका नामांकित हॉटेलमध्ये.येथील स्टेट बँक चौकातील हॉटेलच्या परिसरात ३० डिसेंबरच्या रात्री हा समारंभ पार पडला. विशेष म्हणजे, देश विदेशातील निवडक ७०-८० व-हाडी मंडळींना यावेळी मेजवानी देण्यात आली. या लग्नातील उपवर वधू आणि वर हे दोन्ही पुरुषच आहेत. यवतमाळातील एका फोटो स्टुडिओचा वारस या जोडीतील एक आहे. तो गेल्या काही वर्षांपासून कॅलिफोर्नियामध्ये (अमेरिकेत) स्थायिक झाला आहे. तेथील ग्रिनकार्डही त्याला मिळालेले आहे. नामांकित इलेक्ट्रॉनिक कंपनीत तो महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. त्याचे कुटुंबीय मात्र यवतमाळातच आहेत. अमेरिकेत राहणा-या या यवतमाळकर तरुणाला चिनमधील ‘व्हिन’ नामक तरुण आवडला. सुरूवातीला ओळख, नंतर मैत्री आणि शेवटी प्रेम झाले. ही अजब प्रेमकहाणी लग्नबेडीत अडकण्यासाठी सज्ज झाली. आपले आईवडील यवतमाळात आहे म्हणून लग्नही यवतमाळातच करण्याचे ठरले. ३० डिसेंबरला ‘नवरा नवरी’ येथे आले. ‘गेट टू गेदर’ करायचे अशा नावाने हॉटेल बुक करण्यात आले आणि सायंकाळी धुमधडाक्यात लग्न उरकले. या समारंभाला यवतमाळातील क्वचितच कोणी उपस्थित होते. मात्र, अमेरिका, चिनमधून ५०-६० मित्र आले होते. त्यात १० समलिंगी जोडप्यांचाही समावेश होता. दुस-या दिवशी या समलिंगी विवाहाची वार्ता कळताच सर्वसामान्य यवतमाळकरांनी मात्र तोंडात बोटे घातली. तर नवपरिणित दाम्पत्य मात्र मधुचंद्राला निघून गेले. दरम्यान, आमच्या हॉटेलमध्ये फक्त गेट टू गेदर झाले. लग्न झाले का याविषयी माहिती नसल्याचे संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापकांनी  ‘लोकमत’ला सांगितले.आईचा विरोध झुगारला-यवतमाळातील या तरुणाच्या अशा समलिंगी विवाहाला त्याच्या आईचा विरोध होता. मात्र, मुलाच्या मर्जीपुढे तिचे काही चालले नाही. लहानपणापासून हुशार असलेला आपला मुलगा आज अमेरिकेत चांगल्या पगाराची नोकरी करतो, एखाद्या सुस्वरुप तरुणीशी त्याचे लग्न लावावे हे आईचे स्वप्न चकनाचूर झाले. शेवटी चिनमधील तरुणाशीच त्याने लग्न केले. लग्नाच्या पूर्वी या समलिंगी जोडप्याने यवतमाळातील चार-पाच प्रतिष्ठितांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचीही चर्चा आहे. हॉटेलमधील समारंभात या समलिंगी जोडप्याला हळद लावून, अंतरपाट धरून रितसर वैदिक पद्धतीने विवाह पार पडला. या प्रकरणी स्थानिक मुलाच्या कुटुंबियांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. परंतु त्याच्या नातेवाईकांनी या विवाहाला दुजोरा देताना हे प्रकरण माध्यमात येऊ नये, अशी विनंती केली.

टॅग्स :Gay Marriageसमलिंगी विवाहYavatmalयवतमाळ