शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

Ganpati Festival 2018 : राज्यातील गणेश मूर्तींसाठी शास्त्रशुद्ध जानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 15:40 IST

- निशिकान्त मायीलातूर : मुंबई-पुण्यातील भव्य-दिव्य श्रीगणेश मूर्तींसह लालबागच्या राजा गणपतीसाठी शास्त्रशुद्ध जानवे तयार करून दरवर्षी पाठविले जाते. विशेषत: महाराष्ट्रात ब्रह्मगाठीच्या जानव्यांना मागणी असते, अशी माहिती शास्त्रोक्त जानवे निर्मिती करणारे श्याम चेंडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.जानवे अर्थात यज्ञोपवित निर्मितीचा व्यवसाय विस्तारला आहे. अकोला येथील श्याम चेंडके हे लालबागच्या राजासह ...

- निशिकान्त मायी

लातूर : मुंबई-पुण्यातील भव्य-दिव्य श्रीगणेश मूर्तींसह लालबागच्या राजा गणपतीसाठी शास्त्रशुद्ध जानवे तयार करून दरवर्षी पाठविले जाते. विशेषत: महाराष्ट्रात ब्रह्मगाठीच्या जानव्यांना मागणी असते, अशी माहिती शास्त्रोक्त जानवे निर्मिती करणारे श्याम चेंडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

जानवे अर्थात यज्ञोपवित निर्मितीचा व्यवसाय विस्तारला आहे. अकोला येथील श्याम चेंडके हे लालबागच्या राजासह अनेक भव्य गणेश मूर्तींसाठी जानवे तयार करतात. विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही त्यांनी तयार केलेले जानवे पोहोचले आहेत. जानवे तयार करणे ही एक कला असून त्यासाठी त्यांनी एक मशीनही तयार करून घेतली आहे. त्या माध्यमातून एकावेळी अनेक जानवे ते तयार करून त्याचे आकर्षक पॅकिंग बनवून पुरवितात. ब्रह्मगाठीच्या जानव्याला अधिक मागणी असल्याचे ते म्हणाले.

कोल्हापुरात प्रशिक्षण...जानव्याचे शिवगाठ व ब्रह्मगाठ असे दोन प्रकार प्रचलित आहेत. जानव्याचा धागा हा ९ पदरी असतो. त्याला एकत्र करून त्रिसूत्री आकार देण्यात येतो. शिवगाठीचे जानवे साधारणपणे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात वापरले जातात तर ब्रह्मगाठीचे जानवे महाराष्ट्रात प्रचलित आहेत. त्यासाठी चेंडके यांनी कोल्हापूर येथे खास प्रशिक्षण घेतले आहे. त्यात प्रावीण्य मिळविल्यानंतरच त्यांनी या व्यवसायाशी गाठ बांधली.

जानव्याचे महत्त्व अबाधित...हिंदू समुदायातील अनेक लोक धार्मिक विधीसाठी जानव्याला महत्त्व देतात. याशिवाय विवाह आणि मौंज या कार्यासाठी जानवे गरजेचे असते. अगदी पाच ते सात रुपयांच्या अल्प किमतीत असलेले हे सूत्र व्यवसायात आताशा मोठी उलाढाल करू पाहात आहे. १०० टक्के कॉटन धाग्यापासून बनलेले हे जानवे श्रीगणेशाला पूजेच्या विधीवेळी घालण्यात येते.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Maharashtraमहाराष्ट्र