शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डॅडीची गांधीगिरी! गांधी विचार परीक्षेत डॉन अरुण गवळी ‘टॉपर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 00:16 IST

लगे रहो मुन्नाभाई चित्रपटात भाईगिरी करणाऱ्या मुन्नाभाईवर गांधी विचारांचा प्रभाव पडल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण आता असा प्रकार प्रत्यक्षातही घडला आहे.

नागपूर - लगे रहो मुन्नाभाई चित्रपटात भाईगिरी करणाऱ्या मुन्नाभाईवर गांधी विचारांचा प्रभाव पडल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण आता असा प्रकार प्रत्यक्षातही घडला आहे. अंडरवर्ल्ड डॉन असलेल्या अरुण गवळीवर सध्या गांधीगिरीचा  प्रभाव झाल्याचे दिसतोय. नागपूरच्या कारागृहात घेण्यात आलेल्या गांधी विचार परीक्षेत ‘डॉन’ अरुण गवळीने चक्क पहिला क्रमांक पटकावला आहे.  

गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना कारागृहात पाठविण्यात येते. यात हत्या, दरोडे, बलात्कार सारखे गंभीर गुन्हे करणाºया कैद्यांना डांबले जाते. शिक्षा भोगल्यानंतर या कैद्यांमध्ये खरोखरच परिवर्तन होते का, हा खरा प्रश्न आहे. कारागृह ही शिक्षा भोगण्यापेक्षा कैद्यांसाठी प्रायश्चित्त करण्याचे स्थान असावे ही महत्त्वाची संकल्पना आहे. कदाचित याचा विचार करून कारागृहात  शिक्षणातून परिवर्तन घडविण्यासाठी गांधी विचार परीक्षेला प्रोत्साहन देण्यात आले आहे. दरवर्षी या कारागृहातील अनेक बंदिजन परीक्षा देतात. यावर्षीही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये १६० कैद्यांनी सहभाग नोंदविला. त्यांना अभ्यासासाठी गांधी विचारांची पुस्तकं पुरविण्यात आली. नागपूरच्या कारागृहातील अंडासेलमध्ये शिक्षा भोगणाºया डॉन अरुण गवळी यानेही ही परीक्षा दिली. त्याला पुरविलेल्या साहित्यातून गांधीजींचे विचार आत्मसात केले आणि ही परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली.  गांधीजींचे विचार हे अहिंसेचे आहेत, याच विचारांची भीती इंग्रजांनाही होती. अरुण गवळी याचे व्यक्तिमत्त्व  गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, यातून दहशत निर्माण केली होती. आता परीक्षेच्या माध्यमातून का होईना हा डॉन गांधी विचाराशी जुळला आहे. मात्र, परीक्षा पास करणे आणि हे विचार प्रत्यक्ष आचरणात आणणे यात फरक आहे. चित्रपटात गांधी विचारांना आत्मसात करणारा ‘मुन्नाभाई’ बदलला, असाच बदल अरुण गवळीत होणार का?तुरुंग फोडणा-या कैद्यांनीही मारली बाजी ३१ मार्च २०१५ च्या मध्यरात्री नागपूर मध्यवर्ती कारागृहातून मोक्काचे पाच कुख्यात कैदी कारागृह सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले होते. या कैद्यांनी तेव्हा अख्खी पोलीस यंत्रणा हादरवून सोडली होती. हे कैदी सध्या नागपूर कारागृहात आहेत. त्यांनीही गांधी विचाराची परीक्षा दिली होती. तेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे.  गांधी विचार बंदिवानांसाठी लाभदायी सहयोग ट्रस्ट, सर्वोदय आश्रम नागपूर आणि मुंबई सर्वोदय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांसाठी गांधी विचार परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा बंदिवानांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी तसेच आचारविचारात आमूलाग्र परिवर्तन घडवून आण्यासाठी लाभदायी ठरत आहे. त्यातून बंदिजनांच्या वागणुकीत सकारात्मक बदल घडत आहे. -राणी भोसले, अधीक्षक, नागपूर कारागृह

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीnewsबातम्या