शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गडकरी समर्थकांना मिळाली संधी

By admin | Updated: December 6, 2014 02:08 IST

मंत्रिमंडळ निवडताना भाजपाने विदर्भाला झुकते माप दिले असून, त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाच वरचष्मा दिसून येतो

यदु जोशी, मुंबईमंत्रिमंडळ निवडताना भाजपाने विदर्भाला झुकते माप दिले असून, त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाच वरचष्मा दिसून येतो. आज शपथ घेतलेले भाजपाचे विदर्भातील पाच मंत्री आणि या आधीच मंत्रिमंडळात असलेले वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे गडकरींचे खंदे समर्थक म्हणून ओळले जातात. विदर्भातून मंत्री निवडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फारसा वाव मिळाला नसल्याचे दिसते.नवे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना १९९७ मध्ये जिल्हा परिषदेची भाजपाची उमेदवारी मिळवून देण्यात गडकरी यांचे पक्षांतर्गत विरोधक बनवारीलाल पुरोहित यांची मोलाची भूमिका होती. मात्र निवडून आल्यानंतर बावनकुळे हे गडकरी समर्थक बनले. कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले राजकुमार बडोले हे जिल्हा परिषदेत शाखा अभियंता होते. व्हीआरएस घेऊन राजकारणात आले. तेही गडकरी यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. अनुसूचित जातीचे असलेले बडोले दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. अकोल्याचे डॉ. रणजित पाटील यांना राज्यमंत्री पद मिळाले असून, ते पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहेत. पाटील यांनी बी.टी.देशमुख यांचा पराभव केल्यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. गडकरी समर्थक असल्याची बक्षिसी त्यांना मिळाली.मंत्रिपदाची लॉटरी लागलेले अमरावतीचे प्रवीण पोटे हे बिल्डर आहेत. त्यांचे इंजिनियरिंग कॉलेजही आहे. आधी ते काँग्रेसमध्ये होते. भाजपात येऊन त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत प्रवेश केला. तेदेखील गडकरींचे खास विश्वासू म्हणून ओळखले जातात. > अहेरीचे राजे अंबरीशराजे आत्राम यांचे आजोबा राजे विश्वेश्वरराव हे खासदार तर वडील सत्यवानराजे हे आमदार होते. अंबरीशराजे हे सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर आणि गडकरींच्या माध्यमातून भाजपाशी जोडले गेले आहेत. स्थानिक भाजपाचे पदाधिकारी आणि खासदार अशोक नेते यांच्याशी त्यांचे खटके उडत असतात. असे असूनही पक्षाने त्यांना राज्यमंत्रिपद देऊन स्थानिक प्रस्थापितांना धक्का दिला. फडणवीस यांचे समर्थक असलेले चैनसुख संचेतींना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही.इच्छुकांच्या पदरी निराशाविदर्भात इच्छुक असलेल्यांची निराशा करीत भाजपाने नवीन चेहऱ्यांना संधी दिली. भाऊसाहेब फुंडकर, चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, प्रकाश भारसाकळे, कृष्णा खोपडे, डॉ. अनिल बोंडे यांच्या पदरी निराशा आली. पश्चिम विदर्भातील दोन्ही राज्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत. बुलडाणा जिल्हा होल्डवरबुलडाणा जिल्ह्यातून भाऊसाहेब फुंडकर, चैनसुख संचेती आणि डॉ. संजय कुटे हे तीन जण मंत्रिपदाचे दावेदार होते. त्यापैकी एकाही नावावर शिक्कामोर्तब न झाल्याने या जिल्ह्यातून कोणालाही मंत्रिपद मिळाले नाही. मागासलेल्या या जिल्ह्याचा मंत्रिपदाचा बॅकलॉग कायम राहिला. रणजित पाटील यांच्या रुपाने अकोला जिल्ह्याला १० वर्षांनंतर मंत्रीपद मिळाले. शिवसेनेने केली निराशाशिवसेनेने विदर्भाला केवळ एक राज्यमंत्रिपद दिले. विदर्भात सर्वाधिक मतांनी विजयी झालेले संजय राठोड यांना राज्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये मुंबईचा वरचश्मा आहे.