शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली : अबुझमाडच्या जंगलात सी-६० कमांडोंनी केला नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, एकाला केले ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 20:05 IST

सी-६० पथकातील जवान परत येत असताना छत्तीसगडच्या सीमेतील मौजा घमंडी व लाहेरीपासून ४० किलोमीटरवर असलेल्या फोदेवाडा जंगल परिसरात वारंवार त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.

गडचिरोली : भामरागड उपविभागांतर्गत येणा-या लाहेरी उपपोलीस ठाण्यापासून ४० किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अबुझमाडच्या जंगलात पोलिसांनी नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. यावेळी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र इतर नक्षलवादी त्या मृतदेहासह जंगलात पसार झाले. या चकमकीत एक जवानही किरकोळ जखमी झाला.पोलीस सूत्रानुसार, गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकातील जवान पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात आणि अपर पो.अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या नेतृत्वात भामरागड तालुक्यात अभियानावर होते. यादरम्यान नक्षलवाद्यांचा सेंट्रल कमिटी मेंबर सोनू उर्फ भूपती याने विघातक कृत्य करण्यासाठीची योजना आखण्यासाठी तळ उभारल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे सी-६० पथकाने तिकडे मोर्चा वळवत हल्ला चढविला. यात एक नक्षलवादी मारल्या गेला. नक्षलवाद्यांनी एके-४७ आणि लाईट मशिनगनसारख्या रायफलने सी-६० पथकावर गोळीबार करत मृत नक्षलवाद्याला आपल्यासोबत घेऊन जंगलात पळ काढला. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली. मात्र सोमवारी दुर्गम भागातील जंगलातून पोलिसांचे पथक भामरागडमध्ये पोहोचले.जीवाची पर्वा न करता नक्षलवाद्यांचा सामनासी-६० पथकातील जवान परत येत असताना छत्तीसगडच्या सीमेतील मौजा घमंडी व लाहेरीपासून ४० किलोमीटरवर असलेल्या फोदेवाडा जंगल परिसरात वारंवार त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. परंतू न डगमगता पोलीस जवानांनी तो हल्ला परतवून लावला. यादरम्यान नक्षलवाद्यांची एक गोळी पोलिसांच्या सी-६० पथकातील एका कमांडोच्या पिट्टूतून आरपार गेली. तरीही जवानांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या संख्येने असलेल्या नक्षलवाद्यांना जेरीस आणले. पथकाच्या या कामगिरीचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीMaharashtraमहाराष्ट्र