शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फुरसुंगी, उरुळी देवाची पालिकेच्या हद्दीतून बाहेर नाहीत;  राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

By दीप्ती देशमुख | Updated: August 21, 2023 13:10 IST

अंतिम अधिसूचना कायद्याच्या चौकटीतच घेतली जाईल, अशी हमीही यावेळी सरकारने न्यायालयाला दिली.

मुंबई : पुण्यातील  फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे पुणे महापालिकेतून वगळण्यात आलेली नाहीत. यासंदर्भात अद्याप अंतिम अधिसूचना काढण्यात आलेली नाही, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. अंतिम अधिसूचना कायद्याच्या चौकटीतच घेतली जाईल, अशी हमीही यावेळी सरकारने न्यायालयाला दिली. फुरसुंगी व उरुळी देवाची, ही दोन गावे पुणे महापालिकेच्या हद्दीतून वगळण्याच्या राज्य सरकारच्या मार्च २०२३ च्या निर्णयाला रणजीत रासकर व अन्य काही जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे होती.महापालिकेचा कार्यकाळ  फेब्रुवारी २०२२मध्ये संपुष्टात आल्याने पालिकेवर आयुक्तांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि गावे वगळण्याचा निर्णय त्यांच्याशी सल्लामसलत करून घेण्यात आला आहे. कायद्यानुसार,  पालिकेच्या महासभेशी सल्लामसलत केल्याशिवाय सरकार हा निर्णय घेऊ शकत नाही. प्रशासकाबरोबर केलेली सल्लामसलत ही कायद्याला अभिप्रेत असलेली 'सल्लामसलत' नाही, असा युक्तिवाद याचिकादारांचे वकील प्रल्हाद परांजपे व अॅड. मनिष केळकर यांनी केला.

मात्र, राज्याचे महाअधिवक्ते बीरेंद्र सराफ यांनी राज्य सरकारने गावे वगळण्याबाबत सरकारने अंतिम अधिसूचना काढली नसल्याची माहिती खंडपीठाला दिली. तसेच महाराष्ट्र महापालिका अधिनियम, कलम 452 (ए) अंतर्गत प्रशासक   पालिकेसंबंधीत सर्व निर्णय घेऊ शकतो. 'अद्याप अंतिम अधिसूचना काढण्यात आलेली नाही. ती जारी करण्यापूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता करू. आवश्यकता भासल्यास याचिकदारांना सुनावणी देऊ,' अशी हमी सराफ यांनी न्यायालयाला दिली. त्यांच्या या विधानानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली. तसेच याचिकदारांना 10 दिवसांत पालिकेकडे निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईPuneपुणे