शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या वाढदिवशीच शहीदावर होणार अंत्यसंस्कार, केळगाव शोकसागरात

By admin | Updated: June 24, 2017 06:27 IST

जम्मू कश्मीरमध्ये पाकच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप सर्जेराव जाधव यांच्यावर आज केळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमतसिल्लोड(औरंगाबाद), दि. 23 - जम्मू कश्मीरमध्ये पाकच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप सर्जेराव जाधव यांच्यावर आज केळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री त्यांच्या वीरमरणाची बातमी कळताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. संदीपचे एक दिवसापूर्वीच आपल्या वडीलांशी बोलणे झाले होते. विशेष म्हणजे आज, शनिवारी संदीपच्या मुलाचा वाढदिवस आहे. दुर्दैवाने मुलाच्या वाढदिवसाच्याच दिवशी पित्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. काल रात्री संदीप जाधव यांचं पार्थिव औरंगाबादमध्ये दाखल झालं आहे. आज सकाळी 9 वाजता त्यांच्यावर सिल्लोड तालुक्यातील मूळ गावी केळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आता वाढदिवस साजरा करावा की शहीद दिन साजरा करावा अशा द्विधा मन:स्थितित संदीपचा परिवार आहे. गुरूवारी जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानी बॉर्डर एक्शन टीमने केलेल्या भ्याड हल्ल्यात संदीप सर्जेराव जाधव शहीद झाले. संदीप जाधव शहीद झाल्याची बातमी सर्व टीव्ही चॅनल्सवर सुरु होती. ही बातमी केळगाव वासियांसाहित सर्व राज्यातील जनतेने बघितली. परंतू संदीपच्या वडिलांशिवाय कुटुंबातील लोकांना रात्रभर ही माहिती कळुच दिली नाही. संदीप जाधवच्या वडीलांनी रात्री 9:30 ला टीव्ही सुरु केला आणि तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीने तिच्या वडीलाचे फ़ोटो बघितले आणि पप्पा म्हणून ओरडली, आजोबांनी लगेच टीव्ही बंद केला अन् छातीवर दगड ठेवून रात्रभर ही बातमी कुणालाच कळू दिली नाही.मुलाच्या वाढदिवशी बापावर अंत्यसंस्कार ...संदीप जाधवचा मुलगा शिवेंद्रचा आज शनिवारी पहिला वाढदिवस आहे. गुरुवारी संदीप ला वीर मरण आले. शुक्रवारी तांत्रिक अडचणी मुळे संदीप चे प्रेत केळगावला येवू शकले नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी 9 वाजता त्यांच्यावर सिल्लोड तालुक्यातील केलगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे . आता वाढदिवस साजरा करावा की शहीद दिन साजरा करावा अशा द्वि धा मनस्थितित संदीपचा परिवार आहे. संदीप हा 2002 मध्ये सैन्यात भरती झाला होता. 15 वर्ष त्याची नोकरी झाली होती . अवघ्या दीड वर्षात तो सेवानिवृत्त होणार होता, पण नियतीला हे मान्य नव्हते . दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्यात संदीपला वीरमरण आले. संदीपचे मोठे भाऊ रविंद्र व वडील सर्जेराव हे शेती करतात. संदीपच्या पश्चात तीन वर्षाची मुलगी मोनिका व एक वर्षाचा मुलगा शिवेंद्र तसेच पत्नी उज्वला आई वडील असा परिवार आहे.कुटुंबातील लोकांना धक्का बसेल म्हणून ही बातमी लपवली असली तरी रात्रभर ते हे दुःख लपवून एकांतात रडत बसले होते. संपूर्ण केळगाव व परिसरातील लोक या घटनेमुळे स्तब्ध झाले होते. शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत संदीपच्या कुटुंबाला ही बातमी कळू नये यासाठी गावकऱ्यांनी नियोजन केले होते. मिडियाच्या लोकांनाही शुक्रवारी सकाळी 10 पर्यंत बाहेरच थांबविण्यात आले होते. सकाळी प्रशासनाचे अधिकारी ,पोलिस बघुन या घटणेचा उलगड़ा झाला. या घटनेमुळे केळगाव सहित सिल्लोड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.एक दिवसांपूर्वी झाले होते अखेरचे बोलणे-संदीप जाधव यांनी बुधवारी आपल्या वडिलांना फोन करून कुटुबांच्या व्यक्तींची खुशाली विचारली होती. बाबा मी चांगला आहे तुम्ही कसे आहात . माझ्या मुलाचा वाढदिवस आहे मी बोर्डर वर असल्याणे येवू शकत नाही. पण तुम्ही मुलाचा वाढदिवस साजरा करा मी लवकरच येतो. असे बोलुन् संदीप ने फोन कट केला.केळगाव येथील सेवानिवृत्त सैनिक.......केळगाव या गावातील अतापर्यन्त पंचवीस जवान हे देशसेवेसेत कार्यरत असून याची सुरुवात सन् 1982 सालापासून सुरु झाली.गावातील विलास कौतिक सुल्ताने यांनी 1982 साली सैन्यात दाखल होऊन ही सुरुवात केली.त्यानंतर विश्वनाथ खंडू शिंदे 1987,निवृत्ति परसराम मुळे 1988, भिकुलाल भालचंद्र बड़ोदे 1986,मानिकराव उत्तम गरुड़ 1996, गोकुळ हरी इवरे 1995,चिंधाराम रामदास निंभोरे 1984 ,रामदास भिकन मख 1989 या सनिकांनी देशसेवेसाठी आयुष्य वेचुन सेवानिवृत्त झाले असले तरी मात्र गावातील युवकांना देशसेवेसाठी प्रव्रुत्त केले.व तब्बल पंचवीस युवक हे आज मिल्ट्री मध्ये देशसेवेसाठी आपले कर्तुत्व बजावत आहे.सैन्यात कार्यरत असलेले गावातील जवान.......योगेश पोतदार,ज्ञानेश्वर मुळे,सोमनाथ विट्ठल कोल्हे,गजानन विश्वनाथ माखोडे,लक्ष्मण सुखदेव मुळे,कैलास तुकाराम मख,बबलू संजय जाधव,विकास जगन पवार,जगदीश भीमराव कोठाळकर, राजू भगवान डाखोरकर,समाधान साळुबा पगारे,दत्तू विश्वनाथ आदमाने,अमोल विश्वनाथ शिंदे यांच्यासह अजुन दहा ते बारां जवान सैन्यात सेवा बजावत आहे.केळगाव येथील तीसरे जवान शहीद.....यापुर्वी केळगाव येथील माधव नारायण गावंडे 8 जुलै 2003, कळुबा भावराव बनकर 27 फेब्रुवारी 2010 साली देशसेवा बजावत असताना शहीद झाले होते. तर 22 जून गुरुवार 2017 रोजी दहशदवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात प्रत्युत्तर देताना संदीप जाधव यांना वीरमरण आले.