शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नल महाडिक यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

By admin | Updated: November 19, 2015 12:16 IST

जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना धारातीर्थी पडलेले कर्नल संतोष महाडिक यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत

सातारा, दि. १९ - जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना धारातीर्थी पडलेले कर्नल संतोष महाडिक यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. साता-यातील पोगरवाडी या महाडिक यांच्या मूळगावी कुटुंबियांसह हजारो गावक-यांनी साश्रूनयनांनी महाडिक यांना अखेरचा निरोप दिला. दरम्यान केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज सकाळी कर्नल महाडिक यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. कर्नल महाडिक यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
कुपवाडा जिल्ह्यतील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हाजी नाका परिसरातील दाट जंगलात सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक (३९) शहीद झाले होते. जंगलाच्या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यानंतर कर्न महाडिक यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम हाती घेण्यात आली, दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाडिक यांच्यासह चार जवान जखमी झाले होते. मात्र उपचारांदरम्यान कर्नल महाडिक शहीद झाले. 
त्यानंतर श्रीनगर येथील बेस कँपवर त्यांना लष्कराकडून मानवंदना देण्यात आली व पार्थिव हवाई दलाच्या खास विमानाने काल महाडिक यांचे पार्थिव पुण्याच्या लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. अखेर आज  साताऱ्याच्या जिल्हा रूग्णालयात आणि आरेदारे गावात त्यांचे पार्थिव काहीवेळासाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी पोगरवाडी येथे हजारो गावक-यांच्या उपस्थितीत, लष्करी इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.