शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

गणिताचा पाया असणारी पावकी, निमकी अन् पाढे आता अ‍ॅपवर

By admin | Updated: June 7, 2015 02:40 IST

गणिताचा पाया पक्का करायचा म्हटले की पाढ्यांना पर्यायच नाही. मात्र, प्रत्येकालाच पाढ्यांशी गट्टी जमवायचा जरा कंटाळा येतो.

हिनाकौसर खान-पिंजार ,  पुणेगणिताचा पाया पक्का करायचा म्हटले की पाढ्यांना पर्यायच नाही. मात्र, प्रत्येकालाच पाढ्यांशी गट्टी जमवायचा जरा कंटाळा येतो. शिवाय आता कॅल्क्युलेटरच्या जमान्यात पाढे कोण पाठ करणार? विस्मरणात गेलेली पावकी, निमकी, पाऊणकीची अष्टकं कुठून लक्षात ठेवणार? मात्र ही कोष्टकं हसत-खेळत आणि ऐकत पाठ करण्याची किमया एका क्लिकवर आली आहे. अ‍ॅपवर आता पाढे पाठ करता येतील. पाढ्यांना काहीतरी भयंकर समजून अंकगणिताशी कट्टी करणाऱ्या मुलांना अ‍ॅपच्या माध्यमातून सहजगत्या पाढे स्मरणात ठेवता येणार आहेत. मुले मोबाईलवर ‘गेम’ खेळतात. गाणी ऐकतात. ते आता पाढेही ऐकू शकतील. निर्मिती एपिकचे मंदार नामजोशी यांनी ही किमया साधली आहे. ते म्हणाले, ‘ विज्ञान समजून घेण्यासाठी गणिताची मजा समजणेही आवश्यक असते. गणित सोपे वाटू लागल्यावर आपोआपच मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्यासाठी हरवत चाललेले पाढे महत्त्वाचे वाटले. शिवाय केवळ मराठी भाषेत पाढ्यांची, कोष्टकांची गमंत आहे. मग, तीच आपल्या मुलांना देण्याचे ठरले. मागील तीन-चार वर्षांपासून यावर काम सुरू होते. गुगल प्लेस्टोअरमध्ये अंकनाद टाईप केल्यानंतर अंकनादाचे १ ते १२ पर्याय उपलब्ध होतात. यामध्ये पावकी, निमकी, पाऊणकी,सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्री, १ ते १०० अंक, २ ते १० पाढे, ११ ते २० पाढे, २१ ते ३० पाढे असे १२ पर्याय उपलब्ध होतात.