अकोला : मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाने २२ ते ३१ जुलैमध्ये विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान दोन हजार ५९८ फुकटे प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून रेल्वेने तब्बल १0 लाख २७ हजार ६६ रुपयांचा दंड वसूल केला.विभागातील अमरावती, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नाशिक, धुळे, खंडवा, बऱ्हाणपूर आदी प्रमुख रेल्वे स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी करण्यात आली. ४८ प्रवाशांकडून १३ हजार ४४0 रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती विभागीय जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)
फुकट्या प्रवाशांकडून १0 लाख दंड वसूल
By admin | Updated: August 2, 2016 05:10 IST