नाशिक : अनुदानित इंधन बंद केल्यानंतर खासगी पंपावर डिङोल भरताना अनेक जिल्ह्यांत वाद झाल्यानंतर अखेर शासन आणि परिवहन महामंडळाला सुबुद्धी सुचली असून, आजपासून पुन्हा एसटीच्या पंपांमध्ये इंधन भरण्यात येणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
एसटी कर्मचारी संघटनेने वर्षभरापासून त्यासाठी पाठपुरावा केला होता. वर्षभरापूर्वी शासनाने सर्वच शासकीय वाहनांना अनुदानित इंधनाचा पुरवठा कमी केला होता. त्यानंतर वर्षभरात खासगी इंधनाच्या दरात झालेली वाढ ही शासनाकडून पुरविण्यात येणारे इंधन आणि बाजारातील इंधनाचे दर जवळपास सारखेच झाले. तरीही शासन महामंडळाच्या बसेसला इंधन पुरवित नव्हते.
खासगी पंपांवर रांग लावणो, त्यात प्रवाशांचा वेळ वाया जाणो
तसेच मिश्रित इंधनामुळेही महामंडळाला फटका बसत होता. त्यातच खासगी पेट्रोल पंपचालक कधीही संप करण्याची शक्यता गृहीत धरून प्रवाशांचे हाल होऊ नये, म्हणून एसटीच्या पंपांवर इंधन देणो अत्यावश्यक झाले होते.
आधीच तोटय़ातील एसटीला नफ्यात आणण्यासाठी पंपावर इंधन पुरविणो हा एक मार्ग होता. त्यासाठी मान्यताप्राप्त संघटनेने वारंवार शासनाला आणि प्रशासनाला निवेदनही दिले होते. त्यानंतर अखेर प्रशासनाने हा निर्णय जाहीर
करून डेपोमधील पंपात इंधन पुरविण्याचा निर्णय जाहीर
केला. (प्रतिनिधी)
च्खासगी पेट्रोलपंपांवर इंधन भरताना येणा:या समस्यांची जाणीव संघटनेने प्रशासन आणि शासनाला करून दिली होती. त्यासाठी आंदोलनेही केली होती. अखेर शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेऊन एसटी डेपोच्या पंपांमध्ये इंधन टाकण्याचा निर्णय घेतल्याने आमच्या आंदोलनाला यश आले आहे. त्याचा महामंडळाला फायदाच होणार असल्याचे कर्मचारी संघटनेच्या सुधाकर वाकचौरे यांनी सांगितले.