शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

बोगस नळपाणी योजनेविरोधात जव्हारमध्ये मोर्चा

By admin | Updated: May 14, 2017 02:33 IST

नळपाणी योजनेचा बोजवारा उडाला असून तब्बल ४८ लाख रूपये खर्चून उभी राहिलेली नळपाणी योजना अवघ्या तीन वर्र्षातच वाया गेली

हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : तालुक्यातील नांदगांव ग्रामपंचायतीची नळपाणी योजनेचा बोजवारा उडाला असून तब्बल ४८ लाख रूपये खर्चून उभी राहिलेली नळपाणी योजना अवघ्या तीन वर्र्षातच वाया गेली आहे. जागोजागी लागलेली गळती, वापरलेले साहित्य मुदत बाह्य तसेच जुनाट असल्याने ते पाणी घरोघरी पोहचण्या ऐवजी मातीमोल होत आहे. या विरोधात तहाणलेल्या ग्रामस्थांनी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मोर्चा काढला. जुना राजवाडा ते पंचायत समिती या मार्गावरुन काढलेल्या या मोर्चामध्ये ग्रामसेवकाने केलेल्या मनमानीचा व ठेकेदाराने केलेल्या कामाजे वाभाडे काढण्यात आले. सहायक गटविकास अधिकारी वाडेकर यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात आले. शिष्टमंडळाच्या दोन ते तीन तासाच्या बैठकीनंतर प्रशासनानकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी धरणे आंदोलन मागे घेतले. पाण्याची समस्या कायम दुर करण्यासाठी प्रयत्न करावा जेथे टॅँकरने पाणी पुरवठा होत असेल तेथे कायमची पाण्याची व्यवस्था करावी असे आदिवासी विकास मंत्री तथा पालक मंत्री विष्णू सवरा यांनी आवाहन केले होते, मात्र येथील मुजोर अधिकाऱ्यांना विहिरीला पाणी आहे. फक्त दुरूस्ती करायची परंतू तीही यांचे कडून होत नसल्याची खंत यावेळी ग्रामस्थांनी केली. कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हवर्ष २०१३ ते २०१६ या काळात पुर्ण झालेल्या नळपाणी योजनेच्या कामाचा दर्जा अगदिच सुमार असल्याने तिला जागोजागी गळती लागली आहे. शासकीय कामकाजात निविदा प्रसिध्द करतांना काम पुर्ण करण्याची वेळ निश्चित केलेली असते. एखादी नळपाणी योजना असेल तर तिला किमान सहा महिने ते एक वर्ष कालावधी असतो. मग ही योजना पुर्ण करण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी लागला आहे. तसेच नियमानुसार कालावधीनंतर दरमहा ठरविलेल्या टक्केवारीनुसार दंड आकरण्यात येतो. तो दंडही आकरण्यात यावा व निकृष्ठ केलेल्या काम अंदाजपत्रका नुसार करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.विहिरही नादुरूस्त असून तीही तातडीने दुरूस्त करावी तसेच नांदगांव ते टोकरखांड या चार कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामास अग्रक्रम देण्यात आला होता. मात्र आठ महिंने उलटूनही रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे तो लवकरात लवकर तयार करावा अशीही मागणी करण्यात आली आहे. अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. >ग्रामसेवकच बनले ठेकेदारया सर्व बाबींना जबाबदार ग्रामसेवक डि. सी. पाटील मात्र नेहमीप्रमाणे गैरहजर होते. हा सर्व प्रकाराच्या मागे तेच जबाबदार असल्याचे ग्रामस्थांनी सहायक गटविकास अधिकारी वाडेकर यांच्याकडे मांडले आहे. जव्हार तालुक्यात ४८ ग्रामपंचायती व २ ग्रामदान मंडळे आहेत, यात बहुतेक ग्रामसेवक ठेकेदार असून कुठलेही कामे ते स्वत: ठेकेदार पध्दतीने करून घेत आहेत. तसेच वाटेल तसे व निकृष्ठ दर्जाचे काम यांचेकडून होत आहेत. त्यांच्या विरोधातील शेकडो लेखी तक्रारी धुळखात असून गटविकास अधिकारी तथा मुख्य कार्याकारी अधिकारी यांनी एकाही ग्रामसेवकावर कारवाई केलेली नाही.