शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

यापुढे कोणी हनुमान चालिसा पठण केले तर जाहीर सत्कार करू - देवेंद्र फडणवीस

By गणेश वासनिक | Updated: August 21, 2022 19:31 IST

राज्यात नवे सरकार आले आहे. आता येत्या काळात सण, उत्सव, जयंती जोरात साजरी केली जाईल

अमरावती - महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसा पठण केली तर गुन्हा होता. म्हणूनच खासदार, आमदार राणा दाम्पत्यांना १४ दिवस कारागृहात डांबून ठेवले. पण, मला या दाम्पत्यांचा सार्थ अभिमान आहे. मात्र, यापुढे कोणी हनुमान चालिसा पठण केले तर त्यांचा जाहीर सत्कार करू असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अमरावतीत राणा दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या दहिहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला फडणवीसांनी हजेरी लावली होती. 

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात नवे सरकार आले आहे. आता येत्या काळात सण, उत्सव, जयंती जोरात साजरी केली जाईल. यापुढे कोणतेही निर्बंध, सक्ती असणार नाही. आता भ्रष्ट प्रवृतीचे सरकार गेले असून एकनाथ शिंदे आणि माझं सरकार आल्यामुळे आता जनतेला कसं खुले खुले वाटते. दहीहंडी ही हंडी नसून, तो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. या हंडीतून निघणारी विकासाची मलई प्रत्येकापर्यंत पाेहचवू असं सांगत फडणवीसांनी खासदार आणि आमदार राणा दाम्पत्यांच्या समाजकार्य, विकासकामांची स्तुती केली.

खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेला ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, अभिनेता गोविंदा, खासदार रामदास तडस, खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, महंत मोहनदादा, आमदार प्रताप अडसड, आमदार रवी राणा, उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया आदी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRavi Ranaरवी राणा