शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
3
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
4
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
5
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
6
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
7
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
8
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
9
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
10
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
11
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
12
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
13
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
14
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
15
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
17
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
18
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
19
रिअलमीचा धमाका! ७०००mAh बॅटरीसह Realme Narzo 90 सिरीज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
20
हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित...
Daily Top 2Weekly Top 5

भोगलगाव ते सिंगापूर, आईला ‘फॉरिन’ला नेणाऱ्या लेकाची प्रेमळ गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 11:08 IST

Mother & Son: ब्लॉकचेन तज्ज्ञ असलेला दत्तात्रय सिंगापूरमध्ये नोकरी करतो आणि ‘फॉरिन’ नावाचे फक्त ऐकलेले जग आपल्या आईनेही पाहावे म्हणून तो आईला सिंगापूरला घेऊन गेला.

बीड : बीड जिल्ह्यातले भोगलगाव ते सिंगापूर, शेतमजुरी ते ब्लॉकचेन हा प्रवास दत्तात्रय जाधवसाठी सोपा नव्हता; पण तो करतानाच त्याच्या मनात होते की, आपण जी काही प्रगती करू त्यात आपले कुटुंब, आपली आई आपल्यासोबत हवी. तो दहावीत असतानाच वडील गेले; पण भाऊ, आई यांच्या साथीने त्याने आपल्या जगण्याला मेहनतीची चाके लावली. आज ब्लॉकचेन तज्ज्ञ असलेला दत्तात्रय सिंगापूरमध्ये नोकरी करतो आणि ‘फॉरिन’ नावाचे फक्त ऐकलेले जग आपल्या आईनेही पाहावे म्हणून तो आईला सिंगापूरला घेऊन गेला. त्याचसंदर्भात त्याने लिहिलेली एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली.  

सोशल मीडियात लिहिलेल्या पोस्टमध्ये दत्तात्रय म्हणतो, ‘‘खेड्यात आईने आयुष्यभर कष्ट केले. तिने कधी विमान पाहिले नव्हते, आता विदेशातले लेकाचे जग, ऑफिस पाहून तिच्या नजरेत अभिमान, आनंद आहे. मी सगळ्यांना एकच सांगतो, आपले नवीन जग, विदेश आपल्या पालकांनाही दाखवा, त्यांना होणारा आनंद मोजता नाही येणार!’’ दत्तात्रय ब्लॉकचेनसह हॅकिंग विषयातला तज्ज्ञ आहे. त्याने आजवर अनेक हॅकॅथॉन जिंकले आहेत.

पिवळे लुगडे अन्‌ सिंगापूरnपिवळे लुगडे नेसून सिंगापूरला लेकाचे ऑफिस पाहायला गेलेली आई आणि तिचा प्रेमळ लेक अर्थात सोशल मीडियात व्हायरल झाला. दत्तात्रयशी ‘लोकमत’ने संपर्क केला तर तो म्हणाला, “भोगलगावातले दिवस आठवतात मला अजूनही. वडील, भाऊ, आई शेतमजुरी करीत. nमला एकच माहिती होते की ही परिस्थिती बदलायची तर मला मेहनत, अभ्यासच करायला हवा. बीसीएस केले औरंगाबादला, काही क्लासेस लावले हैदराबादला आणि मला चांगली नोकरी मिळाली; पण आईला तेव्हा हैदराबादलाही नेता आले नाही; पण पुढे पुण्यात नोकरीला लागलो आणि मी आईला सोबत घेऊन गेलो. पुतण्या शिकायला आला. nमनात एकच होते, सुखाचे दिवस आले तर आई सोबत हवीच. पत्नीही मला समविचारी मिळाली. सिंगापूरला नोकरी लागली आणि इथे स्थिरावताच मी आईला सिंगापूरला घेऊन आलाे.’’

टॅग्स :Familyपरिवारsingaporeसिंगापूर