शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात

By admin | Updated: October 6, 2016 03:49 IST

फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपवर आफ्रिकन तरूणाशी केलेली मैत्री नवी मुंबईमधील महिलेला चांगलीच महागात पडली आहे.

नवी मुंबई : फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपवर आफ्रिकन तरूणाशी केलेली मैत्री नवी मुंबईमधील महिलेला चांगलीच महागात पडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्या तरूणाने तोतया कस्टम अधिकाऱ्यासह एकूण तिघांनी सदर महिलेची ७ लाख रूपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. आफ्रिकेमध्ये वास्तव्य करत असल्याचे सांगून एका व्यक्तीने फेसबुकवरून नवी मुंबईमधील तरूणीशी मैत्री केली. फेसबुकवरील संभाषणातून चांगली मैत्री झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवरून नियमित संवाद सुरू झाला. युवतीबरोबर प्रेमाचे नाटक करून लग्न करण्याचे आश्वासन दिले. आफ्रिकेमधून लॅपटॉप, मोबाइल, महागडे कपडे व २० हजार पाऊंड्स पाठवत असल्याचे त्याने सांगितले. काही दिवसांनी अमीतकुमार नावाच्या व्यक्तीचा त्या महिलेस फोन आला.

कस्टम अधिकारी असल्याचे सांगून आफ्रिकेमधून लाखो रूपयांचे साहित्य आले असल्याचे सांगितले. हे साहित्य ताब्यात घेण्यासाठी तुम्हाला बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील, असे सांगितले. महिलेचे मन वळवून तिला एका बँकेतील अनोळखी व्यक्तीचा खाते नंबर सांगितला. महिलेने संबंधित अधिकाऱ्यावर विश्वास ठेवून ७ लाख ४० हजार रूपये बँकेत जमा केले. पैसे जमा केल्यानंतर ते तत्काळ हडप करून तिघांनी महिलेची फसवणूक केली आहे. लग्नाचे आमिष दाखविलेल्या तरूणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होवू शकला नाही. यामुळे बँकेत चौकशी केली असता संबंधित खात्यात पैसेच नसल्याचे निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याविषयी वाशी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

फेसबुकवर फे्रंडलिस्टमध्ये किती व्यक्ती आहेत हे दाखविण्यासाठी अनेक जण ओळख नसलेल्यांची फे्रंडशीप रिक्वेस्ट मान्य करतात. अनोळखी व्यक्तींशी संभाषण केले जाते. व्हॉट्सअ‍ॅपवरही फारशी ओळख नसणाऱ्यांशी तासन्तास गप्पा मारणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याचा गैरफायदा घेवून फसवणूक केली जात आहे. याशिवाय मेल करून लाखो रूपयांची लॉटरी लागली असल्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून अशा सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.