शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांना जलदगतीने परवानगी देणारा मैत्री कायदा विधानसभेत संमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 05:58 IST

विरोधकांनी या विधेयकावर चर्चा करताना सरकारवर टीका केली. हे सरकार आल्यापासून राज्यातील उद्योग गुजरातला जात असून आता ते या नव्या कायद्यामुळे लवकर गुजरातला जातील, असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात येणाऱ्या उद्योगांना जलदगतीने आणि सुलभरित्या परवानगी मिळाव्यात यासाठी उपयुक्त ठरणारा ‘मैत्री कायदा’ शुक्रवारी विधानसभेत संमत करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या संदर्भातील महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक २०२३ विधानसभेत मांडल्यानंतर त्यावर चर्चा झाली. या कायद्यामुळे महसूल, पर्यावरण, प्रदूषण, उद्योग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व परवानगी तत्काळ मिळणार आहेत.

विरोधकांनी या विधेयकावर चर्चा करताना सरकारवर टीका केली. हे सरकार आल्यापासून राज्यातील उद्योग गुजरातला जात असून आता ते या नव्या कायद्यामुळे लवकर गुजरातला जातील, असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी काढला. त्यावर गुजरातला प्रकल्प गेल्याची टीका होते, मात्र आम्ही महाराष्ट्रात प्रकल्प कसे आणले याबद्दल कुणी बोलत नाही, असे उत्तर मंत्री सामंत यांनी विरोधकांना दिले.

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आला आहे. देशातील एकूण गुंतवणुकीपैकी २८ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. आरबीआयने यासंदर्भातील अहवाल सादर केला आहे. मैत्री कायदा उद्योग आणि परकीय गुंतवणुकीसाठी फायद्याचा आहे, असे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाUday Samantउदय सामंत