शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांपर्यंत उपचार मोफत मिळतील पण दवाखाने आहेत कुठे? महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यासाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 09:33 IST

महात्मा फुले योजना आता राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंब व अधिवास प्रमाणपत्रधारक (डोमिसाइल सर्टिफिकेट) कुटुंबांना लागू करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य सरकारने अलीकडेच महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना राज्यभरासाठी लागू केली. या योजनेअंतर्गत उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे विमाकवच देण्यात आले आहे. ही योजना राज्यातील बड्या रुग्णालयांतही लागू व्हावी. यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत. सद्य:स्थितीत राज्यातील शासकीय आणि खासगी अशा १,३५० रुग्णालयांत ही योजना लागू आहे.   

महात्मा फुले योजना आता राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंब व अधिवास प्रमाणपत्रधारक (डोमिसाइल सर्टिफिकेट) कुटुंबांना लागू करण्यात येत आहे. यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतला म्हणून गाजावाजा करण्यात आला. मात्र, शहरी मध्यमवर्गातील बहुतांश कुटुंबे ज्या खासगी रुग्णालयांत उपचारांसाठी जातात. तिथे मात्र ही योजना घेण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, धर्मादाय रुग्णालये जी खासगी रुग्णालये आहेत, त्या ठिकणीसुद्धा ही योजना लागू करण्यात आलेली नाही.

शहरांतील खासगी रुग्णालयांना वावडे का?योजनेअंतर्गत जे दर आजारांवरील उपचारांसाठी निश्चित करण्यात आले आहेत, ते शहरातील रुग्णालयांच्या दृष्टीने कमी असल्याचे प्राथमिक कारण योजनेच्या सुरुवातीपासूनच देण्यात येत आहे. त्यामुळे शहरांतील फारशी मोठी रुग्णालये या योजनेत सहभागी झालेली नाहीत. ही मोठी रुग्णालये ज्यामध्ये चांगल्या सुविधा आहेत, त्यांचा फायदा रुग्णांना या योजनेमधून व्हावा यासाठी आता प्रयत्न करावे लागणार आहेत.

२०० खासगी रुग्णालयांचा सहभागया योजनेचा काही दिवसांपूर्वीच विस्तार करण्यात आला आहे. त्यात योजनेअंतर्गत येणाऱ्या आजारांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच त्यांच्या उपचारांचे दरही वाढविण्यात आले आहेत. राज्यात २००० खासगी रुग्णालयांना ही योजना लागू करण्याची इच्छा आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांतील २०० रुग्णालयांना या योजनेत सहभागी व्हायचे आहे. याबाबत लवकरात निर्णय घेण्यात येईल. ही योजना घ्यावी म्हणून कोणालाही जबरदस्ती करू शकत नाही. तसेच जी धर्मादाय खासगी रुग्णालये आहेत, त्यांनी या योजनेत यावे यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील.   - विनोद बोंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी