शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : चिपळुणात मुख्य रस्त्यावर मगरींचा होतोय मुक्तसंचार

By संदीप बांद्रे | Updated: July 1, 2024 15:45 IST

चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीत मगरींचे प्रमाण खूपच वाढले आहे

चिपळूण : गेल्या काही दिवसांत शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीत मगरींचा वावर वाढला आहे.  अशातच बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरच रात्रीच्या वेळी मगरींचा मुक्तसंचार वाढला आहे. 

शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीत मगरींचे प्रमाण खूपच वाढले आहे. अगदी रहदारी असलेल्या बाजारपूल व शिवनदी पुलानजीक भल्या मोठ्या मगरींचे दर्शन नेहमी होते. त्यातच आता मगरींच्या पिल्लांचे प्रमाणही वाढले आहे. या दोन्ही नद्यांमध्ये जागोजागी मगरी दिसू लागल्या आहेत. आतातपर्यंत या मगरींपासून कोणताही धोका पोहचलेला नाही. परंतु मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शहरातील गोवळकोट चर येथे कायम मगरी असतात. साधारण तीन फुटापासून दहा फूट लांबीच्या मगरी येथे आहेत. सुमारे 60 हुन मगरींचे वास्तव्य या परिसरात आहेत. रस्त्यावरून येता-जाता येथे मगरी दिसतात. हे ठिकाण 'मगर पॉईंट'म्हणून पर्यटकांमध्ये परिचित आहे. या ठिकाणच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र निधी अभावी  हे काम रखडले. आता शहरातील अन्य भागातही मगरीचा वावर वाढला आहे. या मगरी रात्रीच्या वेळी थेट रस्त्यावर येत असल्याने नागरिकांमध्येही भीती व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी बाजारपेठेतील शिव नदी पुलावर दहा फुटी मगर मुक्तपणे संचार करत होती. हा प्रकार काही वाहन धारकांनी कॅमेरा बद्ध केला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नैसर्गिक अधिवास धोक्यात

गेल्या चार महिन्यांपासून वाशिष्ठी व शिवनदीत गाळ उपासाचे काम सुरु होते. या मोहिमेत दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यावर उत्खनन करण्यात आले. तसेच किनाऱ्यावरील झाडीझुडुपे तोडण्यात आली. त्यामुळे या भागातील जलचर प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला. विशेषतः मागरींच्या अधिवासास अधिक धोका पोहचला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. 

टॅग्स :ChiplunचिपळुणRainपाऊस