शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

राज्यात सात दिवस मिळणार फुकट दूध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:53 AM

अतिरिक्त दूध गायींच्या गोठ्यात नव्हे तर, दूध संघात तयार होते़ शेतकऱ्यांकडून संकलन केलेल्या एका टँकरच्या दुधावर प्रक्रिया करून तीन टँकर दूध कृत्रिमरित्या तयार केले जाते.

अहमदनगर : सरकारी दूधधोरणाविरोधात शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे़ महाराष्ट्रदिनानंतर ३ मेपासून राज्यात फुकट दूध वाटपाचे अनोखे आंदोलन हाती घेण्याचा निर्णय नगर येथील बैठकीत झाला. याची माहिती शेतकरी सुकाणू समितीचे राज्य समन्वयक अजित नवले यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली़नवले म्हणाले, अतिरिक्त दूध गायींच्या गोठ्यात नव्हे तर, दूध संघात तयार होते़ शेतकऱ्यांकडून संकलन केलेल्या एका टँकरच्या दुधावर प्रक्रिया करून तीन टँकर दूध कृत्रिमरित्या तयार केले जाते. त्याचा परिणाम दरावर झाला आहे़ सरकारने दुधाला २७ रुपये भाव जाहीर केला़ प्रत्यक्षात मात्र १५ ते २० रुपये भाव मिळतो़ कृत्रिम रसायनयुक्त दुधामुळे सामान्यांचे आरोग्य धोक्यात आहे़ कृत्रिम दूध तयार करणाºया संघांवर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही़ एकीकडे शेतकºयांची लूट सुरू आहे, तर दुसरीकडे ग्राहकांना विषारी दूध मिळते आहे़ त्याला सरकारचे धोरणच जबाबदार आहे़ त्यामुळे शेतकरी संघटनांनी सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली असून, राज्यातील अहमदनगरसह औरंगाबाद, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे.शेतकरी संपाला जूनमध्ये एक वर्ष पूर्ण होत आहेत़ या पार्श्वभूमीवर दूध दरवाढीसाठी लढा उभारण्याचा निर्णय समितीने घेतला आहे़ औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा ग्रामपंचायतीने ३ ते ९ मे, या काळात गाव, गल्ली, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फुकट दूध वाटपाचा ठराव केला आहे़ या धर्तीवर महाराष्ट्रदिनी राज्यभरातील इतर ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत आंदोलनाचा ठराव केला जाईल़ त्यानंतरही सरकारने दखल घेतली नाही तर जूनमध्ये राज्यातील सर्व संघटना एकत्र येऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवतील़ शेतकºयांना रस्त्यावर उतरु द्यायचे किंवा नाही, ते सरकारनेच ठरावावे, असा इशारा नवले यांनी या वेळी दिला़दूध संघाकडून फॅटची चोरीशेतकºयांकडून ३़५ फॅटचे दूध घेतले जाते़ प्रत्यक्षात ग्राहकांना मात्र १़५ फॅटचे दूध मिळते़ दूध संघ फॅट चोरतात़ त्याचा लाभ दूध संघ उठवितात़ शेतकºयांना मात्र जास्त फॅटचे दूध देऊनही कमी दर मिळतो़

टॅग्स :milkदूध