शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

"सरकारी जागा वडिलोपार्जित असल्याच्या आविर्भावात प्रशासनाचे मोफत जागावाटप, बेकायदा बांधकामांना संरक्षण कसे देता?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 07:00 IST

उच्च न्यायालयाच्या इमारतीसाठी सरकारकडे जागा नाही. तरीही सरकार बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण कसे देते?

मुंबई : सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना कसे संरक्षण देण्यात येते? सरकारी जागा आपलीच वडिलोपार्जित जागा आहे, अशा आविर्भावात प्रशासन प्रत्येकाला मोफत जागा वाटत चालले आहेत. अनेक प्रकल्पांसाठी सरकार भूसंपादन करीत आहे. तसेच भले मोठे भाडे भरून आपली गरज भागवत आहे. उच्च न्यायालयाच्या इमारतीसाठी सरकारकडे जागा नाही. तरीही सरकार बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण कसे देते? असा प्रश्न करीत उच्च न्यायालयानेराज्य सरकारची कानउघाडणी केली.मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने बेकायदेशीर बांधकामांबाबत स्वयंप्रेरणेने दाखल करून घेतलेल्या याचिकेवर मंगळवारी निकाल राखून ठेवला.मंगळवारच्या सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे बेकायदेशीर झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्याबाबत राज्य सरकारची भूमिका मांडत असताना मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांनी म्हटले की, मी इथे नवीन आहे. मात्र, या सर्व धोरणांवरून असे वाटते की, सरकारी जागा आपली वडिलोपार्जित जागा आहे, असे येथील प्रशासनाला वाटते. दरम्यान, मुंबई पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील ॲस्पी चिनॉय यांनी न्यायालयाला सांगितले की, मुंबईत जर गरिबांना राहायचे असल्यास झोपडपट्टीतच राहावे लागते. त्यावर न्यायालयाने म्हटले की, मुंबईतील गर्दी कमी करण्यासाठी नवी मुंबई वसविण्यात आली.सरकारने जागा संपादित केली. मात्र, परिस्थिती बदललेली नाही. प्रकल्प उभे करण्यासाठी सरकारला जागा शोधावी लागत आहे. मोठी रक्कम भरून ते भाड्याने जागा घेत आहे. दुसरीकडे त्यांच्याच जागेवर उभ्या करण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामांना ते संरक्षण देत आहे. बेकायदेशीर बांधकामांना कायदेशीर बांधकाम करू नका. तीन महिन्यांपूर्वी भिवंडी येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने बेकायदेशीर बांधकामांबाबत स्वयंप्रेरणेने याचिका दाखल करून मुंबई महापालिकेसह आजूबाजूच्या पालिकांना प्रतिवादी केले. मंगळवारी  न्यायालयाने या याचिकेवरील निकाल राखून ठेवला.

‘झोपडीधारकांकडे जाऊन छाननी करू शकत नाही’मुंबईतील झोपडपट्ट्यांवर बेकायदेशीररीत्या मजल्यावर मजले चढत असताना पालिका आणि सरकारने काय केले? असा सवाल उच्च न्यायालयाने केला. ‘पालिकेला याबाबत मर्यादित अधिकार आहेत. आम्ही प्रत्येक झोपडीधारकाकडे जाऊन कागदपत्रांची छाननी करू शकत नाही. आम्ही जर फोटोपास मागत गेलो तर मूर्खपणा ठरेल. सरकार झोपड्यांची गणना करते,’ असे चिनॉय यांनी म्हटले. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारGovernmentसरकार