शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

घर देण्याच्या नावाखाली फसवणूक, एटीएसचा निलंबित अधिकारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:50 IST

मुख्यमंत्री कोट्यातून म्हाडामध्ये स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाºया रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेट राज्य दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) निलंबित सहायक पोलीस निरीक्षक चालवत होता.

मुंबई : मुख्यमंत्री कोट्यातून म्हाडामध्ये स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाºया रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेट राज्य दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) निलंबित सहायक पोलीस निरीक्षक चालवत होता. त्याच्यासह तिघांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. आरोपींमध्ये एका महिलेसह पुजाºयाचा समावेश आहे.मुलुंडचा रहिवासी दिलीप भोसले (५४) हा नागपाडा एटीएसमध्ये सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. एका गुन्ह्यातील तपासावरून त्याला निलंबित केले होते. त्याच्यासह साथीदार सुनीता तूपसौंदर्य (३३) आणि गणेश पुजारी (४०) यांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील अन्य पाच ते सहा जणांचा शोध सुरू आहे.तक्रारदार घाटकोपरच्या पंतनगर परिसरात राहतो. काही महिन्यांपूर्वी भोसले त्याच्या अन्य साथीदारांसोबत पंतनगरच्या एका हॉटेलमध्ये म्हाडात स्वस्तात घर मिळवून देण्याबाबत चर्चा करत होते. तक्रारदाराच्या मागच्याच टेबलवर ते बसले होते. तक्रारदाराने त्यांचे संभाषण ऐकून घराबाबत विचारणा केली. या रॅकेटने त्याला विश्वासात घेत मुख्यमंत्री कोट्यातून स्वस्तात घर देतो असे सांगितले. त्याने आपल्या मित्रांसोबत पैसे गुंतवले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पंतनगर पोलीस ठाणे गाठले. मात्र पोलिसांनी त्याला प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली. गुन्हे शाखेच्या कक्ष ७कडे तक्रार दाखल होताच त्यांनी चौकशीअंती तिघांना अटक केली. आरोपींनी १० ते १२ जणांना गंडविल्याचे समोर आले आहे.बडे मासे गळाला लागणार?अटक तिन्ही आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी बडे मासे अडकण्याची शक्यता असून, काही म्हाडा अधिकारी असल्याचाही संशय गुन्हे शाखेला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा