शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

ऑनलाइन मास्क विक्रीतून ग्राहकांची लूट, २५ ते १५० रुपयांमध्ये मिळणाऱ्या मास्कची आता ९०० रुपयांना विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 05:47 IST

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केवळ वैद्यकीय सेवा देणा-या व्यक्तींना एन-९५ मास्क वापरण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबई : कोरोना विषाणूच्या दहशतीने हाहाकार माजवला असून राज्यात मास्कची उपलब्धता नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन खरेदीच्या माध्यमातून मास्क आणि जंतुनाशकांच्या विक्रीतून ग्राहकांची लूटमार सुरू आहे. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केवळ वैद्यकीय सेवा देणा-या व्यक्तींना एन-९५ मास्क वापरण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.कोरोना विषाणूच्या भीतीमुळे अनेक जण मास्क घालून फिरताना दिसत आहेत. काही जण तर एन-९५ प्रकारचे मास्क वापरत आहेत. शहर-उपनगरातील काही केमिस्टमध्ये मास्क आणि जंतुनाशकांची उपलब्धता नसल्याने अवघ्या २५ ते १५० रुपयांत मिळणारे मास्क ऑनलाइन बाजारपेठेत तब्बल ९०० रुपयांना मिळत आहेत. तर सॅनिटायझर्सही ३०-५० रुपयांपासून उपलब्ध होते, परंतु, ऑनलाइन बाजारपेठेत याची किंमत १५०० हजारांपासून सुरू आहे. बाजारात अनेक प्रकारचे मास्क विक्रीसाठी आले असून यामध्ये डिस्पोजल मास्क, एन-९५ मास्क, पोल्युशन मास्क यासह कपड्यांपासून तयार केलेले मास्क विक्रीसाठी आहेत. दहा रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंतच्या मास्कची विक्री केली जात आहे.सामान्यांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्कऐवजी स्वच्छ रुमाल वापरण्याचे आवाहन सामान्यांना केले आहे. मास्क वापरण्यापेक्षाही त्यांची विल्हेवाट योग्य रीतीने लावणे आवश्यक असते. वापरलेले मास्क असेच कचरापेटीत टाकल्यास कचरा गोळा करणारी मुले, व्यक्ती यांच्या हाताला लागून त्यांना विषाणूंची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे या व्यक्तींनी मास्कपेक्षा साधा स्वच्छ रुमाल नाकाला बांधला आणि वापरल्यानंतर स्वच्छ गरम पाण्यात धुणे योग्य ठरेल, असे त्यांनी सांगितले. असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइसच्या माहितीनुसार, देशात दरवर्षी २४१.३ दशलक्ष मास्क तयार केले जातात. चीनमध्ये मास्क उत्पादन करणा-या कंपन्या बंद झाल्यानंतर दुस-या देशात भारतातील मास्क जाऊ लागले आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागल्यााने मास्कच्या किमतीही ऑफलाइन बाजारातही वाढल्या आहेत.>कस्तुरबा रुग्णालयात चार हजार मास्कचा साठापालिका रुग्णालयात मास्कचा तुटवडा नाही. सध्या कस्तुरबा रुग्णालयात सुमारे चार हजार मास्कचा साठा उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास मास्क आणि औषधे स्थानिक पातळीवर खरेदी करण्याचे अधिकारही रुग्णालयांना दिलेले आहेत, पूर्वतयारी म्हणून पालिकेने नवा आराखडा तयार केला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

टॅग्स :corona virusकोरोना