शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Gunratne Sadawarte : गुणरत्न सदावर्तेंविरुद्ध अकोट पोलिसात फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 20:19 IST

Gunratne Sadawarte : ॲड. गुणरत्न सदावर्तेंसह तिघांविरुद्ध सोमवार, ११ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

अकोला : एसटी महामंडळाच्या कामगारांना खोट्या भूलथापा देऊन कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळल्याप्रकरणी अकोट पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ॲड. गुणरत्न सदावर्तेंसह तिघांविरुद्ध सोमवार, ११ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

महाराष्ट्र एसटी कामगार सेना संघटनेचे कार्याध्यक्ष विजय ओंकारराव मालोकार (रा. अकोला) यांनी अकोट पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान काही कर्मचारी, पदाधिकारी वेगवेगळ्या लोकांमार्फत आर्थिक शोषण करून फसवणूक करीत आहेत. संपादरम्यान प्रशासनाने कर्मचाऱ्यांना निलंबित व बदली आदेश काढले आहेत. त्यातून आपली सुटका व्हावी, यासाठी कर्मचाऱ्यांमार्फत प्रयत्न सुरू झाले होते. कर्मचाऱ्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेत अजयकुमार गुजर व ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी खोट्या भूलथापा देऊन कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३०० व ५०० रुपये जमा केले आहेत. राज्यभरातून कर्मचाऱ्यांकडून जवळपास ३ कोटी रुपये जमा केल्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे अकोट आगाराचे गजानन रामभाऊ बढे आणि अकोट आगाराच्या इतर कर्मचाऱ्यांद्वारे संकलित केलेले ७४ हजार ४०० रुपये १४ नोव्हेंबर २०२१ रोजी अकोट डेपोत वाहक म्हणून नेमणुकीवर असलेल्या प्रफुल्ल गावंडे यांनी अजयकुमार गुजर यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले आहेत. प्रशासनाद्वारे केलेली कार्यवाही रद्द करून देतो, असे खोटे आश्वासन देऊन कर्मचाऱ्यांकडून अजयकुमार गुजर व ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे गोळा केले आहेत. ॲड. सदावर्ते यांनी त्यांच्या पत्नी ॲड. जयश्री पाटील यांच्या मध्यस्थीने अजयकुमार गुजर व प्रफुल्ल गावंडे यांच्याकडून अकोट आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचे ७४ हजार ४०० रुपये जमा करून फसवणूक केली आहे, अशा फिर्यादीनुसार, अकोट पोलिसांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते, अजयकुमार बहादुरसिंग गुजर, ॲड. जयश्री पाटील व प्रफुल्ल गावंडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अकोट पोलीस करीत आहेत.

टॅग्स :ST Strikeएसटी संपAkolaअकोलाakotअकोटCrime Newsगुन्हेगारी