शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या महानंदचे अखेर गुजरातच्या एनडीडीबीकडे हस्तांतरण; मदर डेअरीने घेतला ताबा
2
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
3
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
4
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
5
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
6
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
7
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
8
मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल!
9
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
10
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
11
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
12
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
13
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
15
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
16
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
17
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
18
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
19
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
20
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...

दोन वर्षाच्या आरोहीचे ४ विक्रम

By admin | Published: March 26, 2017 4:06 AM

येथील आरोही पावबाके वय २ वर्ष ४ महीने हिच्या नावावर चार विक्रम नोंदविले गेले आहेत. येथील प्राथमिक शिक्षक विजय

डहाणू : येथील आरोही पावबाके वय २ वर्ष ४ महीने हिच्या नावावर चार विक्रम नोंदविले गेले आहेत. येथील प्राथमिक शिक्षक विजय बाळासाहेब पावबाके यांची ती मुलगी. तिच्या समवयीन मुले भाषा बोलण्याचे प्राथमिक धडे घेत असतांना तिने मात्र इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड या भारतीयांचे जगभरातील रेकॉर्ड नोंदवणाऱ्या संस्थेत ४ विक्र म नोंदवले आहेत.रेकॉर्ड नोंदणीच्या किडस मेमरी कॅटेगरी मध्ये तिने आपल्या अभिजात, अविश्वसनीय पाठांतर क्षमतेच्या जोरावर  1) youngest to read and recite English alphabets, 2) most number of images identified (190 images), 3) Youngest to recite more than 30 rhymes, 4) youngest to recite longest rhymes having 20 lines   या चार विक्र मांची ची नोंद केली आहे . तिच्या विक्र मांची दखल घेण्यासाठी लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्स शी संपर्क केला असता आम्ही लहान मुलांचे रेकॉर्ड ठेवणे बंद केल्याचे सांगण्यात आले. परंतु यावरच न थांबता तिच्यात असलेल्या अभिजात स्मरणशक्तीची कुणीतरी नक्कीच दखल घेईल या हेतूने आरोहिच्या वडिलांनी इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड कडे आवश्यक कागदपत्रे व चित्रिफितीसह अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या टेस्टनंतर किड्स मेमरी कॅटेगरी मध्ये तिच्या या चार विक्र मांची नोंद झाली. यानंतर रेकॉर्ड सेटर्स- लंडन व इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड्स या ठिकाणी देखील रेकॉर्डसाठी रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. ते लवकरच होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)छोट्या आरोहिच्या या अफलातून पाठांतर क्षमतेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तिची आई सरला पावबाके यांनी सांगितले की, प्ले ग्रुप, नर्सरी ग्रुप यांचे वाढलेले अवास्तव महत्त्व व मनमानी फी या पेक्षा त्यांनी आरोहिचा सराव घरीच घेण्याचे ठरवले व त्यात त्यांना यश मिळाले. नर्सरीचा प्रघात सोडून घरीच मुलांचा अभ्यास घेऊन त्यांची अपेक्षित अध्ययन क्षमता विकसीत करावी, असे आवाहन त्यांनी पालकवर्गास केले.