शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

राज्यात चार हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत..-अवयवदान चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 9:09 PM

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यात अवयवदान चळवळीला कृतिशील पाठबळ मिळत असून गेल्या तीन वर्षांत तब्बल ७०२ विविध अवयवांचे प्रत्यारोपण झाले आहे. लोकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे नैसर्गिक अपंगत्व अथवा अपघाताने अवयव गमावलेल्यांच्या जीवनात प्रकाश पडला आहे मात्र अजून चार हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत.अवयवदान हे रक्तदानाइतकेच सर्वश्रेष्ठ दान आहे. याबाबत ...

ठळक मुद्देअलीकडे खेडोपाडी विविध सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांमुळे लोक अवयवदानाकडे वळू लागले जवळच्या नातेवाईकांची संमती संपर्क ठेऊन त्यांना या दानाचे महत्व पटवून द्यावे लागते

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यात अवयवदान चळवळीला कृतिशील पाठबळ मिळत असून गेल्या तीन वर्षांत तब्बल ७०२ विविध अवयवांचे प्रत्यारोपण झाले आहे. लोकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे नैसर्गिक अपंगत्व अथवा अपघाताने अवयव गमावलेल्यांच्या जीवनात प्रकाश पडला आहे मात्र अजून चार हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत.

अवयवदान हे रक्तदानाइतकेच सर्वश्रेष्ठ दान आहे. याबाबत विविध सामाजिक संस्था गेली अनेक वर्षे समाजप्रबोधनाचे काम करीत आहेत; पण मृत्यूनंतर शरीराची चिरफाड करण्यास नातेवाईक तयार नसल्याने अजूनही अनेकांची अवयवदानाची मानसिकता दिसत नाही. तरीही अलीकडे खेडोपाडी विविध सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांमुळे लोक अवयवदानाकडे वळू लागले आहेत.

अलीकडे बदललेली जीवनशैली, धकाधकीचे जीवन, अतिव्यसन व अन्नपदार्थांच्या माध्यमातून शरीरात होणाºया रासायनिक माºयामुळे माणसाचे अवयव लवकर निकामी होऊ लागले आहेत. मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.

मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया अतिशय खर्चाची आहे. या दोन्ही शस्त्रक्रिया सुमारे चार ते पाच तास चालतात व शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला १० ते १२ दिवस रुग्णालयातच रहावे लागते. या प्रकारे या शस्त्रक्रियेस व त्यानंतरच्या सुश्रुषेस बराच खर्च येतो म्हणून जरी मूत्रपिंड व यकृत दान मिळाले तरी संपूर्ण शस्त्रक्रिया व नंतरची महागडी औषधे यामुळे ती रुग्णावर मोफत करणे अशक्य असते. अशा स्वरुपाच्या शस्त्रक्रिया होण्यासाठी दात्या व्यक्तिच्या जवळच्या नातेवाईकांची संमती संपर्क ठेऊन त्यांना या दानाचे महत्व पटवून द्यावे लागते. अशा दात्याच्या व संबधित रुग्णाच्या रक्ताच्या तपासण्या करावे आवश्यक असते.कायदा काय सांगतो...मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रियेत जिवंत व्यक्तीच्या दोनपैकी एकाच मूत्रपिंडाचे आरोपण मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णाच्या शरीरात करता येते. यासंबंधीच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी १९९४ ला भारत सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अस्तित्वात आणून केवळ स्वत:च्या नातेवाइकांनी म्हणजे आई-वडील, भाऊ-बहीण, मुलगा-मुलगी, पती-पत्नी, आजी-आजोबा यांनाच मूत्रपिंड (किडनी) किंवा यकृताचा (लिव्हर) काही भाग दान करण्यास परवानगी दिली. त्यामुळे या दोन्ही अवयवांच्या प्रत्यारोपणामध्ये मर्यादा आल्या आहेत.या व्यक्तींंचे अवयवदान उपयुक्तमृत रुग्णांची मूत्रपिंडे, यकृत, प्लीहा, स्वादूपिंड, आतडी हृदय, फुप्फुसे व त्वचा अशा अवयवांचे आरोपण होऊ शकते. रुग्ण ब्रेनडेड घोषित झाल्यावर २४ ते ४८ तासांतच हे अवयव शस्त्रक्रियेद्वारे रुग्णांच्या शरीरातून काढून घ्यावे लागतात. मेंदूस्तंभ मृत्यू (ब्रेन डेथ), सामान्य मृत्यू (नॉर्मल डेथ) व जिवंत व्यक्ति (लाईव्ह डोनर) या व्यक्ती अवयवदान करू शकतात.मेंदूमृत्यूमुळे अवयव प्रत्यारोपण  वर्ष किडनी लिव्हर फुप्फुसे हृदय इतर अवयव एकूण२०१५ ९७ ४१ ० ५ १३ १५६२०१६ २०४ ११७ १ ३५ ३७ ३९३जुलै २०१७ ७७ ४३ १ २३ ९ १५३एकूण ३७८ २०१ २ ६३ ५९ ७०२