मुंबई : मध्य रेल्वेने ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री चार विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसटीहून कल्याणसाठी लोकल मध्यरात्री १.३0 वाजता सुटेल आणि कल्याण येथे ३ वाजता पाहोचेल. कल्याणहून सीएसटीसाठी लोकल १.३0 वाजता सुटून सीएसटी येथे ३ वाजता पोहोचेल. सीएसटीहून पनवेलसाठी लोकल मध्यरात्री दीड वाजता सुटेल आणि पनवेल येथे २.५0 वाजता पोहोचेल. पनवेलहून सीएसटीसाठी लोकल मध्यरात्री १.३0 वाजता सुटून सीएसटी येथे मध्यरात्री २.५0 वाजता पोहोचेल. चर्चगेटहून विरारसाठी मध्यरात्री सव्वा वाजता लोकल सोडली जाईल. तर शेवटची लोकल पहाटे ३.२५ वाजता सोडण्यात येईल. विरारहून सव्वा बारा वाजता लोकल सोडण्यात येईल. तर विरारहून शेवटची लोकल पहाटे ३.0५ वाजता सुटेल. (प्रतिनिधी)
मध्य रेल्वेवर चार विशेष लोकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 02:58 IST