शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

दाभोलकर हत्येच्या कटात आणखी चौघे

By admin | Updated: June 17, 2016 02:44 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात आणखी चार जणांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये सनातनचा साताऱ्यातील साधक विनय पवार, रुद्र पाटील, जयप्रकाश

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात आणखी चार जणांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये सनातनचा साताऱ्यातील साधक विनय पवार, रुद्र पाटील, जयप्रकाश, प्रशांत जुवेकर यांचा समावेश आहे. सध्या सीबीआयच्या कोठडीत असलेला डॉ विरेंद्र तावडे याने सारंग अकोलकर आणि या चौघांसह हत्येचे कटकारस्थान रचल्याचा दावा सीबीआयने गुरूवारी न्यायालयात केला़ न्यायालयाने अधिक तपासासाठी तावडे याच्या सीबीआय कोठडीत २० जूनपर्यंत वाढ केली़ डॉ़ दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करताना सीबीआयने विरेंद्र तावडेला आलेले ई-मेल आणि सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमातून जप्त केलेली हार्डडिस्क यातून मिळणाऱ्या माहितीची शहानिशा केली असून त्यातून आतापर्यंत तावडे, अकोलकरसह सहा आरोपींची नावे निष्पन्न करण्यात सीबीआयला यश आले आहे़ मडगाव बॉँबस्फोटातील फरारींचाही यामध्ये समावेश आहे. तावडे तपासात सहकार्य करत नसल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे़ २००७ मध्ये हिंदू जनजागृती समितीचा प्रमुख दुर्गेश सामंत यानेही तावडेला मेलद्वारे ‘दाभोलकर यांच्यावर लक्ष केंद्रीत करा’ असे म्हटले होते. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने गेल्या शुक्रवारी नवी मुंबईत अटक केली होती़ न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत सीबीआय कोठडी मंजूर केली होती़ ही मुदत संपल्याने तावडे याला गुरुवारी पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही़ बी़ गुळवे पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले़ सीबीआयचे वकील अ‍ॅड. बी. पी. राजू यांनी तावडे तपासात सहकार्य करीत नसल्याचे सांगून काही विचारले तर आपले डोके दुखत असल्याचे सांगतो़ याशिवाय १४ व १५ जून असे दोन दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले असल्याने त्याच्याकडे पुरेशी विचारपूस करता आली नाही़ साक्षीदारांपैकी एकाने रेखाचित्रावरुन मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी एक हा सारंग अकोलकर असल्याचे ओळखले आहे़ मात्र, तो नेमका कोण हे त्यांना सांगता येत नाही़ (प्रतिनिधी)सीबीआयचा युक्तिवादतावडे याच्या घराची झडती घेतली त्यात एक यादी मिळाली आहे. त्यात हिंदूविरोधी लोकांची नावे असून त्यांना त्यांनी दानव, राक्षस असे संबोधले आहे़ अकोलकर आणि तावडे यांच्यातील ई मेलमध्ये कोड शब्दांचा वापर केला असून काडतुसांना त्यांनी चॉकलेट म्हटले आहे़ अन्य कोड शब्दांचा त्याच्याकडून अर्थ जाणून घ्यायचा आहे़ डॉ़ दाभोलकर आणि कॉ़ पानसरे यांच्या हत्येसाठी एकाच प्रकारच्या शस्त्राचा वापर करण्यात आल्याचे बॅलेस्टिक रिर्पोटमध्ये दिसून आले आहे़ त्यांना १५ हजार जणांची सेना उभारायची आहे़ त्यासाठी सांगलीतील जत, गोव्यातील फोंडा येथे २००९ मध्ये शस्त्रात्रांचे प्रशिक्षण देण्यात आले होते़ त्यात तावडे सहभागी नसला तरी ज्यांनी ही शिबीरे आयोजित केली होती़ त्याच्या संपर्कात तावडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़ तावडे यांनी ही शस्त्रात्रे कोठून खरेदी केली़ त्यासाठी पैसा कोणी पुरविला़, मडगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्यांचा या हत्येत सहभाग होता का याचा तपास करायचा आहे, असे सांगून अ‍ॅड़ राजू यांनी कोठडीत वाढ करण्याची विनंती केली़काय म्हणाले, तावडेचे वकील?आरोपीचे वकील संजीव पुनाळेकर यांनी पोलीस कोठडीत वाढ करण्यासाठी सीबीआयने सादर केलेल्या अहवालाची मागणी केली़ रिर्पोट मिळत नाही, तोपर्यंत युक्तीवाद करणार नसल्याचे सांगितले़ पोलिसांना त्यातील काही बाबी बाहेर पडू नये, असे वाटत असेल तर त्यांनी ते वगळून रिर्पोट द्यावा़ त्यानंतर त्यांना तेथेच रिर्पोट वाचण्यासाठी देण्यात आला़ त्यानंतर पुनाळेकर यांनी सांगितले की, तावडे हे याप्रकरणात पहिले आरोपी नसून तिसरे आरोपी आहेत़ यापूर्वी अटक केलेल्या आरोपींकडून जप्त केलेल्या शस्त्राचा रिर्पोटमध्येही याच शस्त्राने खून झाल्याचे म्हटले होते़पण त्यामुळे दाभोलकर कुटुंबाचे समाधान न झाल्याने पोलिसांनी तावडे हा केवळ सनातनचा साधक असल्याने त्याला या प्रकरणात गोवले आहे़ डॉ़ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला केवळ सनातनचाच नाही तर २० वेगवेगळ्या संघटनांचा विरोध होता़ त्या कायद्याला विरोध करण्याचा अधिकार आहे़ दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर गुळवे पाटील यांनी तावडे याच्या पोलीस कोठडीत २० जूनपर्यंत वाढ केली़कोल्हापूर भेटीत पिस्तुलाविषयी चौकशीवीरेंद्रसिंह तावडे याने एप्रिल-मे २०१३ मध्ये कोल्हापूरला आपल्या दुकानाला भेट देऊन गावठी पिस्तुल बनविण्यासाठी मदत करण्यास सांगितले असून, त्यासाठी सारंग अकोलकरला काही व्यक्तीबरोबर पाठविले होते, असे साक्षीदाराने सांगितले असल्याचे सीबीआयने गुरूवारी न्यायालयात सांगितले़ कोल्हापूरला भेट दिल्याचे तावडे मान्य करीत असून पिस्तुल बनविण्याची चर्चा झाल्याचे तो अमान्य करीत आहे़ आपल्या दातांवर उपचारासाठी भेट दिल्याचे तो सांगत आहे़ सनातनच्या पनवेल आश्रमातून जप्त केलेली हार्ड डिक्स तपासणीसाठी कलिना रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे़त्यातील माहितीवरुन आरोपीकडे चौकशी होणार असल्याचे सीबीआयने सांगितले़ राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सारंग अकोलकर, रुद्र पाटील यांच्याविरोधात २००९ मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर त्यांनी आॅगस्ट २००९ मध्ये फोंडा येथे व सप्टेंबर २००९ मध्ये शस्त्रात्र प्रशिक्षण शिबीर घेतले.