शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Dr. Babasaheb Ambedkar यांच्या लिखाणाचे नवीन चार खंड येत्या डिसेंबरपर्यंत येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 08:28 IST

Dr. Babasaheb Ambedkar: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रावरील बहुचर्चित ग्रंथ ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ आता डिसेंबरमध्ये येणार आहे. यासोबतच आणखीही तीन ते चार नवीन खंड डिसेंबरपर्यंत लोकांच्या हाती येतील.

- आनंद डेकाटे नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रावरील बहुचर्चित ग्रंथ ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ आता डिसेंबरमध्ये येणार आहे. यासोबतच आणखीही तीन ते चार नवीन खंड डिसेंबरपर्यंत लोकांच्या हाती येतील. यातील काही ग्रंथांच्या छपाईच्या कामालाही सुरुवात झाली आहे, हे विशेष.  सन २००४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकही नवीन खंड प्रकाशित झालेला नाही, तसेच आजवर प्रकाशित एकाही इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद झालेला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे गेल्या ३० मार्च रोजी पुनर्गठन झाले. तेव्हापासून नवीन खंड प्रकाशनाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. विशेषत: ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा मूळ इंग्रजी ग्रंथ मराठीत लोकांपर्यंत यावा, अशी अनेकांची इच्छा होती. त्या दिशेने बरेचसे कामही झाले होते. विजयादशमीच्या दिवशी एखादा ग्रंथ प्रकाशित होईल, अशी लोकांची इच्छा होती; परंतु ते शक्य झाले नाही. मात्र, येत्या दोन महिन्यांत म्हणजे डिसेंबरपर्यंत किमान चार नवीन खंड प्रकाशित होणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी सांगितले. या चार खंडांत ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या महत्त्वाच्या ग्रंथाचा समावेश आहे. 

हे साहित्य प्रकाशनाच्या वाटेवर- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे मुखपत्र असलेल्या ‘जनता’ या नियतकालिकाच्या दुसऱ्या खंडाचे काम पूर्ण झाले आहे. - इंग्रजी खंड-१३ च्या मराठी अनुवादित ग्रंथाचे कामसुद्धा पूर्ण झाले आहे. हा मराठी ग्रंथ १२०० पृष्ठांचा आहे. - सोर्स मटेरिअलचा खंड १ -‘डॉ. आंबेडकर ॲण्ड द मूव्हमेंट ऑफ अनटचेबल्स, खंड ६, खंड ८, खंड १० या ग्रंथाचे पुनर्मुद्रणाचे कामदेखील अंतिम टप्प्यावर आहे.  

दोन अप्रकाशित ग्रंथांचीही माहिती विशेष महत्त्वाची बाब म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या दोन अप्रकाशित ग्रंथाची माहिती मिळाली असून, त्या दोन ग्रंथांचा शोध घेणे सुरू आहे. त्यापैकी एक ग्रंथ नोव्हेंबरपर्यंत समितीला मिळू शकेल, असे प्रयत्न सुरू आहेत. -डॉ. प्रदीप आगलावे, सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती 

अशोक विजयादशमीला खंड प्रकाशन न होण्याची जणू परंपराच झाली आहे. नवीन समितीकडून ही परंपरा खंडित होईल, अशी अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली. ३० जुलै २०२१ च्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.   - प्रकाश बन्सोड, अध्यक्ष, भारतीय दलित पँथर

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरMaharashtraमहाराष्ट्र