शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

उबाठाचे चार आमदार, ३ खासदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राऊतांच्या दाव्यावर उदय सामंतांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 20:02 IST

काल संजय राऊत यांनी माझ्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे उत्तर आज मला द्यायचे आहे, असे उदय सामंत म्हणाले.

उदय सामंत यांच्या नेतृत्वात सेनेचे २० आमदार भाजपात जाऊ शकतात असा दावा उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर दावोसमध्ये असलेल्या उद्योगमंत्र्यांनी गेल्या १५ दिवसांत किती आमदार आणि खासदार भेटून गेले याचा आकडाच सांगितला आहे.

काल संजय राऊत यांनी माझ्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे उत्तर आज मला द्यायचे आहे, असे उदय सामंत म्हणाले. उद्योगमंत्री असल्याने सामंत दावोस दौऱ्यावर आहेत. उबाठाच्या ४, काँग्रेसच्या ५ आमदारांनी व उबाठाच्या ३ खासदारांनी मागील १५ दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. याचबरोबर उबाठा गटाचे १० माजी आमदार, काही जिल्हाप्रमुख तसेच काँग्रेसचे काही माजी आमदार-खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे शिवसेनेत सामील होतील, असा गौप्यस्फोट सामंत यांनी केला आहे.  ज्या पक्षाचा अस्त झालाय त्या पक्षाच्या लोकांनी स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी माझा नावाचा वापर करणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. जे लोक मागील महिनाभरात एकनाथ शिंदेंना भेटले आहेत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करावा, असा टोलाही सामंत यांनी लगावला आहे. 

याचबरोबर महाराष्ट्रात होणाऱ्या पाच लाख कोटींच्या गुंतवणुकीवरही सामंत यांनी आज महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस असल्याचे म्हटले आहे. आजच्या दिवसभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सुमारे ५ लाख कोटींची गुंतवणूक आणण्यात यशस्वी झालो आहोत, असे सामंत म्हणाले. मी महाराष्ट्रातून येतानाच सांगितलं होतं की विक्रमी गुंतवणूक महाराष्ट्रात येईल, असे सामंत म्हणाले.  

टॅग्स :Uday Samantउदय सामंतSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना