शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

ट्रक बोलेरो अपघातात एक ठार चार जण जखमी

By admin | Updated: August 1, 2016 21:44 IST

अहमदनगर -टेंभुर्णी राज्य महामार्गावर अपघाताची मालिका चालूच असून मांगी जवळ झालेल्या ट्रक बोलेरो अपघातात एक जण ठार तर चार जण गम्भीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत

करमाळा, दि. १ - अहमदनगर -टेंभुर्णी राज्य महामार्गावर अपघाताची मालिका चालूच असून मांगी जवळ झालेल्या ट्रक बोलेरो अपघातात एक जण ठार तर चार जण गम्भीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. बापुराव विठ्ठल बागल वय ६० रा मांगी असे ठार झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.ज्ञानेश्वर गिरमे वय ४५ वैशाली गिरमे वय ४०, सौरभ ज्ञानेश्वर गिरमे वय तिघे ही राहणार माळीनगर, अकलूज व ट्रक चालक नाव उपलब्ध नाही, असे जखमींची नावे आहेत. रस्त्याच्या विपरीत परिस्थिती मुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात असून आता सरकारी आकडेवारी नुसार ह्या अपघातात या चौपदरीकरण रस्त्याने घेतलेला ८५ वा बळी ठरला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, माळीनगरचे गिरमे कुटुंबीय शिर्डी येथे देवदर्शनाला बोलेरो क्रमांक एमएच ४५ एक ७०६२ मधून जात होते तर दहा चाकी अवजड ट्रक क्रमांक टी. एन. ५२ / जे २३५४ हा जड माल घेऊन बेंगलोरला निघाला होता. यावेळी कामोणे फाट्याजवळील उताराच्या रस्त्यावर वेगाने आलेल्या ट्रकने बोलेरोला जोरदार धडक दिली. यावेळी रस्त्याच्या कडेला थांबलेले बापुराव विठ्ठल बागल यांना ट्रकने फरफटत नेले यात ट्रक व बोलेरो दोन्ही वाहने रस्त्यावर पलटी झाले यामध्ये बागल यांच्या अंगावर ट्रकचा फाळका व पौते पडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी जवळपास असणारे उत्तम बागल, किशोर बागल, राहुल जाधव तसेच बागल फार्म हाऊस वरील मजुरांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले .सदोष रस्त्यामुळे अपघात झाला आहे. रस्ता बनविणाऱ्या कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भुमिका नातेवाईकांनी घेतली आहे.