शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

बोहरा समाजाशी चार पिढ्यांचे नाते! अल्जामिया-तुस-सैफियाह शैक्षणिक संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 11:23 IST

कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये, यासाठी शिक्षण धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. डॉक्टर आणि इंजिनिअरिंगचे शिक्षणही मातृभाषेतून देण्याला सरकार प्राधान्य देईल, असे पंतप्रधान म्हणाले.

मुंबई : ‘‘मी तुमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे. इथे मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाही. बोहरा समाजाशी चार पिढ्यांपासून मी जोडला गेलो आहे, हे माझे भाग्य आहे,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईतील बोहरा समाजाला साद घातली. अल्जामिया-तुस-सैफियाह शिक्षण संस्थेच्या कॅम्पसचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी यांनी समाजाच्या धर्मगुरूंनी दीडशे वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले, असे गौरवोद्गार काढले. 

अल्जामिया-तुस-सैफियाह संस्थेचे कुलगुरू डॉ. सय्यदन मुफद्दल सैफउद्दीन यांच्याकडून पंतप्रधानांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पंतप्रधान म्हणाले, कोणताही समाज वेळेनुसार कसा बदलतो, यावरच त्या समाजाचा विकास अवलंबून असतो.  या संस्थेची शाखा मुंबईत सुरू व्हावी, हे दीडशे वर्षांपासूनचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. ‘दाउदी बोहरा’ हा उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहे. या उद्योजकांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, दाउदी बोहरा समाजाचे शहजादा अलीअसगर कलीम ऊद्दीन, शहजादा कियदजोहर इज इज्जुद्दीन व मान्यवर उपस्थित होते.

मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्यकोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये, यासाठी शिक्षण धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. डॉक्टर आणि इंजिनिअरिंगचे शिक्षणही मातृभाषेतून देण्याला सरकार प्राधान्य देईल, असे पंतप्रधान म्हणाले.

बोहरा समाजाकडून उत्साहात स्वागतआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा मुंबई दौरा आहे. त्यात बोहरा समाजाच्या मुंबईतील कार्यक्रमाला उपस्थित राहात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपले नाते अधिक दृढ असल्याचे संकेत दिले आहेत. 

विशेष म्हणजे बोहरा समाजाची मोठी वस्ती असलेल्या भागात ठिकठिकाणी समाजाच्या बँड पथकांनी मोदींचे उत्साहात स्वागत केले. मोदींना पाहण्यासाठी इमारतीच्या गॅलरी तसेच फुटपाथवर बोहरा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे गुजरातचे मुख्यमंत्री  असल्यापासून मोदींनी समाजाशी जोडलेल्या नात्याची चित्रफितच या कार्यक्रमात सादर करण्यात आली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई