शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या चार खासदारांना डच्चू; पुण्यातून गिरीश बापट यांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 04:59 IST

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये चार विद्यमान खासदारांना डच्चू देण्यात आला आहे. त्यात अनिल शिरोळे (पुणे), हरिश्चंद्र चव्हाण (दिंडोरी) ए.टी.नाना पाटील (जळगाव) आणि शरद बनसोडे (सोलापूर) यांचा समावेश आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये चार विद्यमान खासदारांना डच्चू देण्यात आला आहे. त्यात अनिल शिरोळे (पुणे), हरिश्चंद्र चव्हाण (दिंडोरी) ए.टी.नाना पाटील (जळगाव) आणि शरद बनसोडे (सोलापूर) यांचा समावेश आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही यादी जाहीर करण्यात आली.पुण्यातून अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना भाजपाने उमेदवारी दिली. जळगावमध्ये स्मिता वाघ यांना, दिंडोरीमध्ये कालच राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवार यांना तर सोलापुरातून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली. पवार या २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. बापट की शिरोळे असा घोळ गेले काही दिवस सुरू होता. शेवटी भाजपा श्रेष्ठींनी बापट यांच्या बाजूने कौल दिला. जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ या विधान परिषदेच्या सदस्य असून त्यांचे पती उदय वाघ हे भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष आहेत. भाजपाने आतापर्यंत सहा खासदारांना उमेदवारी नाकारली आहे. त्यात दिलिप गांधी (अहमदनगर) आणि सुनील गायकवाड (लातूर) यांचाही समावेश आहे.काँग्रेसने पाच उमेदवार शुक्रवारी मध्यरात्रीनंतर जाहीर केले. त्यात चंद्रपूर - विनायक बांगडे, जालना - विलास औताडे, औरंगाबाद - सुभाष झांबड, भिवंडी - माजी खासदार सुरेश टावरे आणि लातूर - मच्छिंद्र कामंत यांचा समावेश आहे. २०१४ च्या निवडणुकीत चंद्रपूरमध्ये संजय देवतळे, जालना - विलास औताडे भिवंडी - विश्वनाथ पाटील, औरंगाबाद - नितीन पाटील तर लातूरमध्ये दत्तात्रय बनसोडे हे काँग्रेसचे उमेदवार होते. या सहाही जागा काँग्रेसने गमावल्या होत्या.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा