शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

उदगाव दरोड्याप्रकरणी चौघांना अटक, पाच लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त ; अन्य तिघे साथीदार फरार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 18:05 IST

उदगाव(ता. शिरोळ) येथे दरोडा टाकून महिलेचा खून करुन साडेसात लाख किंमतीचा ऐवज लंपास करणा-या चौघा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलीसांनी शिताफीने अटक केली.

कोल्हापूर, दि. 15 - उदगाव(ता. शिरोळ) येथे दरोडा टाकून महिलेचा खून करुन साडेसात लाख किंमतीचा ऐवज लंपास करणा-या चौघा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलीसांनी शिताफीने अटक केली. त्यांचेकडून दोन दूचाकी, बारा तोळे सोन्याचे दागिने, हत्यारे असा सुमारे पाच लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अन्य तिघे साथीदार फरार आहेत. त्यांचेवर कोल्हापूरसह सांगली, पुणे, अहमदनगर येथे जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

संशयित आरोपी आकाश नामदेव पवार उर्फ जाबाज उपकाºया पवार (वय २०, रा. इंदीरानगर, झोपडपट्टी, तासगाव, जि. सांगली), मैनेश झाजम्या पवार (३५, रा. इटकर, ता. वाळवा, जि. सांगली),  शेळक्या जुरब्या पवार (४९, रा. समडोळी, ता. मिरज, जि. सांगली), विशल उर्फ मुक्या भिमराव पवार (२३, रा. बहादुरवाडी, ता. वाळावा, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. 

उदगांव ते शिरोळ जाणारे बायपास रोडवर निकम मळा येथे शेतवडीत प्रा. प्रितम बाबूराव निकम यांचा बंगला आहे. १३ आॅगस्ट रोजी रात्री बंगल्यावर दरोडा पडला. यावेळी आरडाओरड केल्याने दरोडेखोरांनी प्रितम यांच्या आई-वडीलांवर खूनी हल्ला करुन घरातील साडेसात लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. या हल्यामध्ये अरुणा निकम (५५) यांचा मृत्यू झाला. तर बाबूराव निकम हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांचा एक डोळा निकामी झाला आहे. याप्रकरणी प्रा. प्रितम निकम यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या दरोडा व खून प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हा गुन्हा उघडकीस आनण्यास पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. गुन्ह्याचे गांर्भीय पाहून घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी भेट देवून तपासाबाबत बैठक घेवून मार्गदर्शन केले. 

टॅग्स :Crimeगुन्हा