शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

"मला चुकीनं झालं असं वाटत नाही, यातून पक्षात माझी काय किंमत आहे हे समजलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 15:28 IST

हकालपट्टीच्या वृत्तावर आढळराव पाटील यांची रोखठोक प्रतिक्रिया

शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचंही नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यानंतर शिवसेनेकडून ते पक्षातच असल्याचं स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. या संपूर्ण घटनेनंतर आढळराव पाटील यांनीदेखील आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला.

“अनेकांनी मला सकाळपासून यासंदर्भात विचारणा करण्यासाठी फोन केले. मला क्षणभर काही कळेना. मला वाटलं कोणीतरी मजा करत आहे. मला विश्वास बसत नव्हता शिवसेनेनं माझी हकालपट्टी केली आहे. नंतर मी सामना पेपर वाचला. त्यात बातमी वाचल्यावर मला शॉक बसला. काही बोलावं, काय प्रतिक्रिया द्याव्या हे समजेनासं झालं,” असं आढळराव पाटील म्हणाले. 

“काल रात्रीच मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांना मतदारसंघातील काही कार्यकर्ते भेटायला येणार आहेत हे त्यांना सांगितलं. त्याप्रमाणे आज सकाळची त्यांची वेळही घेतली होती. परंतु आज जनता दरबार असल्यानं जमणार नसून दोन दिवसांनी भेट घेईन असंही सांगितलं. तुम्ही जी पोस्ट केली ती खुप व्हायरल झाली आणि त्याचं मला वाईट वाटलं असं त्यांनी मला सांगितलं. या पोस्टमध्ये मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं त्यात चूक केली असं काही वाटत नाही असं त्यांना सांगितलं. त्यांनीही जे झालं ते झालं असं म्हणत मंगळवारी भेटण्यास सांगितलं,” असंही त्यांनी नमूद केलं.

१८ वर्ष तुम्ही शिवसेनेत असताना अनेकदा तुम्ही पक्षातून जाताय अशा चर्चा सुरू होत्या. पण तुम्ही गेला नाहीत, याचा मला अभिमान असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. मागील चार पाच दिवसांपासून वातावरण तापल आहे. पण माझं काय चुकलं? मी काय कमी केलं पक्षासाठी? माझ्यावरच कारवाई का? कोणीतरी काहीतरी आरोप करायचा. अनेकांनी पोस्ट लिहिली, मग माझ्यावरच कारवाई का? १८ वर्ष या मतदार संघात कोणी नसताना मी राष्ट्रवादीची लढतोय. समर्थपणे त्यांना अंगावर घेतलं, त्याचीच फळं आज मी भोगतोय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

२००९ ला ऑफर होतीपवार यांनी मला २००९ ला ऑफर दिली होती. शिरूरमधून लढू नका, मला तिकडून लढायचं आहे. तुम्हाला दोन टर्म राज्यसभा देतो. ही मीटिंग २४/११ ला झाली होती. त्यावेळी मी बाळासाहेबांवर विश्वास आहे असं सांगितलं. पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. आज खासदार नसताना शिवसैनिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मी लढत असल्याचंही ते म्हणाले. मला हे खुप लागलंकाय पक्षविरोधी काम केलं मी? साडेतीन वर्षात पक्षासाठी काम करताना रूपयाचा निधी नाही, पाठिंबा नाही, तरी बाळासाहेबांचे विचार घेऊन मी फिरतो. रात्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतरही असं होणं, मला हे खूप लागलं आहे. आता कारवाई मागे घेतली पण मला वाईट वाटतं आहे. आज महाराष्ट्रभर जी किंमत केली ते केली. आज मला वाईट वाटलं ज्याप्रकारे कारवाई केली. इतकी वाईट परिस्थिती या पक्षानं माझ्यावर आणली. मला निर्णय मान्य आहे. आता पक्षानं शुद्धीपत्रक काढलं. त्यानंतर मला उद्धव ठाकरे, विनायक राऊत, अनिल देसाई यांचे फोन आले चुकीनं झालं असं सांगितलं. पण मला चुकीनं झालं असं वाटत नाही. यातून पक्षात माझी काय किंमत आहे हे समजलं. मी राष्ट्रवादीला अंगावर घेतलं ही चूक झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मी पक्षाच्या विरोधात नाही, शांत डोक्यानं नंतर विचार करू असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कार्यकर्त्यांनी शांत राहावं. पक्षाविरोधी काही करू नका. आपण बसू. चर्चा करू आणि निर्णय घेऊ अशी सर्वांना विनंती आहे. जनतेनं मला मोठं केलंय. जनता निर्णय घेईल, बघू पुढे काय करायचं ते असंही ते म्हणाले.

टॅग्स :Shivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र