शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

माजी आमदार ‘यशवंत एकनाथ’ यांचे निधन

By admin | Updated: May 18, 2017 00:09 IST

आज कोडोलीत अंत्यसंस्कार, रांगडा नेता हरपला

लोकमत न्यूज नेटवर्क  --कोल्हापूर / कोडोली : कोल्हापूर जिल्ह्यातील रांगडे व्यक्तिमत्त्व व पन्हाळा, गगनबावडा, वैभववाडीचे माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील (वय ८७) यांचे बुधवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास वार्धक्याने कोडोली (ता. पन्हाळा) येथे राहत्या घरी निधन झाले. ‘सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत रोख-ठोक बोलणारा लोकनेता’ अशी त्यांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख होती. कोडोली (ता. पन्हाळा) या त्यांच्या मूळ गावी आज, गुरुवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेले चार महिने पाटील यांना कमालीचा अशक्तपणा होता. संध्याकाळी त्यांचे बोलणे एकदम बंद झाले. त्यानंतर वडगांव येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांचे पार्थिव कोडोली येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात ठेवण्यात आले. पाटील यांच्या निधनाची बातमी पंचक्रोशीत समजली आणि अनेक गावच्या ग्रामस्थांनी कोडोलीकडे धाव घेतली. आपल्या करारी बाण्याच्या नेत्याचे दर्शन घेताना अनेकांना अश्रू आवरत नव्हते. त्यांच्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देत अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके, आमदार चंद्रदीप नरके, अजित नरके यांनी रात्री त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. दि. ४ मार्च १९३० रोजी त्यांचा जन्म पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे येथे झाला. माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी कोडोलीच्या सार्वजनिक कामामध्ये भाग घेण्यास सुरूवात केली. सन १९५७ मध्ये ते कोडोली ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. सन १९६७ पर्यंत ते सदस्य होते. त्यानंतर सेवा संस्थेची स्थापना त्यांनी केली. सन १९६७ मध्ये ते जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा निवडून गेले. सन १९७२ मध्ये ते दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून गेले व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवले. सन १९६८ मध्ये ते जिल्हा काँग्रेसचे प्रतिनिधी झाले. सन १९८२ मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून त्यांनी कोडोली येथे यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. आयुर्वेदिक महाविद्यालयापासून अनेक प्रकारचे शिक्षण या संस्थेमध्ये उपलब्ध आहे. ‘वसंतरावदादा पाटील यांचे एकनिष्ठ’ म्हणून ‘यशवंत एकनाथ’ यांचे नाव अग्रहक्काने घेतले जाते. सन १९७८ ते १९९९ या प्रदीर्घ काळात त्यांनी पन्हाळा, गगनबावडा व सिंधुदुर्ग जिल्"ातील वैभववाडी तालुका अशा मतदारसंघाचे विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. या कालावधीत त्यांनी अतिशय आक्रमकपणे काम करत या तिन्ही तालुक्यांमध्ये अनेक पाणी प्रकल्प मंंजूर करून आणले. हे तिन्ही तालुके दुर्गम असल्याने शेती, वीज, पाणी, रस्ते या मुलभूत गरजांसाठी सातत्याने आमदार म्हणून यशवंत एकनाथ पाटील कार्यरत राहिले. स्पष्ट आणि रोखठोक भाषेत प्रश्नांची मांडणी करून ते सोडविण्यासाठी कमालीचा आग्रह धरणारा नेता, अशीच त्यांची प्रतिमा होती. विधानसभेतील त्यांची भाषणे गाजली. जिल्हा परिषदेतही अधिकाऱ्यांवर वचक ठेवून काम करून घेण्याची त्यांची पद्धत आजही सांगितली जाते. मनमोकळा स्वभाव, परखड बोलणे, आवाजातील जरब, स्पष्टवक्तेपणा आणि कमालीचा आत्मविश्वास या गुणांच्या जोरावर पाटील यांनी ‘यशवंत एकनाथ’या दोन शब्दांमध्ये आपले व्यक्तिमत्त्व उभे केले. कुरळप (ता. वाळवा, जि. सांगली) येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्या भगिनी वासंती यांच्याशी त्यांचा सन १९५१ मध्ये विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अमरसिंह पाटील व सुवर्णा पाटील, छाया पाटील, सुजाता चव्हाण पाटील, स्वरूपा पाटील या चार विवाहित मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके यांचे ते मामा होत.आज सकाळी १० वाजता अंत्यसंस्कारसकाळी सात वाजता पाटील यांचे पार्थिव आमदार वाड्यात नेले जाणार आहे. त्यानंतर आठ वाजता गावातून अंत्ययात्रा काढण्यात येईल. सकाळी १० वाजता दत्त मंदिरासमोरील मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. .......................कोरे, पाटील यांच्यातील संघर्षवारणा खोऱ्यातील तात्यासाहेब कोरे आणि यशवंत एकनाथ यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या कोल्हापूर जिल्"ाने अनेकदा अनुभवला; परंतु या परिसरातील जनतेने कोरे यांना नेहमीच सहकारामध्ये साथ दिली आणि विधानसभेला ‘यशवंत एकनाथ’ यांची साथ सोडली नाही. पाचवेळा आमदार झाल्यानंतर विनय कोरे यांनी त्यांचा १९९९ साली पराभव केला. जिल्ह्यातील आदरणीय व्यक्तिमत्त्व‘यशवंत एकनाथ’ यांना जिल्"ातील सर्वच तालुक्यांमध्ये एक आदराचे स्थान होते. कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते आल्यानंतर त्याच आदराने त्यांचे सर्वत्र स्वागत होत असे. आपल्या रांगड्या कार्यशैलीमुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील हे अस्सल रांगडे व्यक्तिमत्त्व होते. काँग्रेसशी अत्यंत निष्ठावान असलेल्या पाटील यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली. ते माझे अत्यंत जवळचे मित्र आणि मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनाने माझा वैयक्तिक मित्र हरपला आहे.- आ. डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री‘आमदार वाडा’ सुन्न‘जयश’ नावाने असणाऱ्या त्यांच्या निवासस्थानाची ‘आमदार वाडा’ अशीही ओळख आहे. गेली अनेक वर्षे पाटील यांच्या वास्तव्याने सळसळणारा हा वाडा पाटील यांच्या निधनानंतर सुन्न झाला होता.